ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ : ८ वर्षापुर्वी भारतामध्ये IPLच्या सामन्याला सुरवात झाली. क्रिडाप्रेमींच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे ती लोकप्रिय झाली. IPL च्या पहिल्याच मोसमात मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात हरभजन आणि श्रीशांत यांच्यातील वाद जगजाहीर झाला होता. त्यावेळी रागाच्या भरात हरभजनने श्रीशांतच्या श्रीमुखात लगावली होती. ती का लगावली याचं कारण अद्याप कोणालाही माहीत नव्हते.
श्रीशांतच्या श्रीमुखात का लगावली याचा खुलासा स्वत हरभजनने शनिवारी एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात केला. तो म्हणाला, श्रीशांतने खरंतरं नौटंकी केली होती आणि त्यामुळे मी त्याला मारलं. हरभजन सिंग याने पुढे म्हटले की, मैदानात केलेले हे कृत्य म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. हरभजन सिंग आपल्या मुलाखतीमध्ये पुढे म्हणतो की, मात्र, श्राशांतने याने जोर-जोरात रडणं सुरु केलं, जसे की मी त्याला जोरात मारलं. मात्र, तसे काहीही झाले नव्हते. या प्रकरणात मी दोषी होतो आणि आजही मला याचे वाईट वाटते.
२००८ साली झालेल्या आयपीएलच्या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये झालेला मॅचमध्ये हरभजनने श्रीशांतच्या कानाखाली मारली होती. हे प्रकरण क्रिकेटप्रेमी बहुधा विसरले नसतीलच.