मुंबई : ‘‘लंडन आॅलिम्पिकच्या तुलनेत रिओमध्ये भारताच्या पदरी निराशा आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस मोठ्या प्रमाणात खेळत असल्याने आॅलिम्पिक पदक जिंकणे अवघड आहे,’’ असे भारताचा दिग्गज टेनिसपटू महेश भूपती याने म्हटले. मुंबईत एका कार्यक्रमात महेश भूपतीने ‘लोकमत’शी संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘सानिया, प्रार्थना यांनी रिओत चांगली कामगिरी केली असून, आॅलिम्पिक पदकासाठी अधिक मेहनतीची आवश्यकता आहे. टेनिस जागतिक स्तरावर खेळला जाणारा खेळ असल्याने पदक मिळविणे अवघड आहे. मात्र, जिद्द व मेहनतीच्या जोरावर आॅलिम्पिक पदक मिळविणे शक्य आहे.’’ (क्रीडा प्रतिनिधी)
‘...म्हणून आॅलिम्पिक पदक अवघड आहे’
By admin | Published: September 30, 2016 1:51 AM