शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

सॉफ्टबॉलचा एकहाती हिरो

By admin | Published: June 22, 2016 3:18 AM

प्रभावी इच्छाशक्ती असेल तर जन्मजात अपंगत्व असूनही व्यक्तीला उत्तुंग झेप घेण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. डावा हात नसलेला अमरावतीचा अभिजित फिरके एका हाताने

किशोर बागडे,  नागपूर प्रभावी इच्छाशक्ती असेल तर जन्मजात अपंगत्व असूनही व्यक्तीला उत्तुंग झेप घेण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. डावा हात नसलेला अमरावतीचा अभिजित फिरके एका हाताने खेळून सॉफ्टबॉलचे मैदान गाजवीत आहे. स्वत:चे घर नाही, वडिलांचे छत्र नाही; पण सहकारी खेळाडूंच्या पाठिंब्यामुळे अभिजितच्या यशाचा आलेख गगनाला भिडतो आहे. भारताला सॉफ्टबॉलमध्ये नवी उंची गाठून देण्याची त्याची जिद्द आहे.महाराष्ट्र संघातून १३ राष्ट्रीय स्पर्धा, तीन फेडरेशन चषक स्पर्धा, आठ शालेय राष्ट्रीय स्पर्धा आणि भारत-भूतान सॉफ्टबॉल मालिका आदींमध्ये अभिजितचा सहभाग होताच; पण सलग तीन वेळा अ. भा. विद्यापीठ स्पर्धेत खेळून सुवर्णपदक जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला हे विशेष. वयाच्या सातव्या वर्षांपासून मैदानावर असलेला अमरावतीच्या गाडगेनगर भागातील २१ वर्षांचा अभिजित शारीरिक शिक्षणात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. आई हॉटेलमध्ये काम करते. मात्र घरातील विपरीत परिस्थिती अभिजितच्या वाटचालीत अडथळा ठरली नाही. सतत चेहऱ्यावर हसू आणि सकारात्मक वृत्ती जोपासणारा हा खेळाडू सध्या यवतमाळच्या दर्डा कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशनमध्ये एम.पीएड.च्या द्वितीय वर्षाला शिकतो. पंजाबमध्ये चार दिवसांआधी झालेल्या आठव्या फेडरेशन चषकात महाराष्ट्र चॅम्पियन ठरला. या यशात अभिजितचे योगदान राहिले. दिल्लीत सॉफ्टबॉलची पहिली लीग आयोजित झाली. त्यातही महाराष्ट्र संघातून खेळणाऱ्या अभिजितने प्रभावी खेळाच्या बळावर अनेकांना आपलेसे केले.सर्वोत्कृष्ट खेळाडूअभिजितचे साहस आणि आत्मविश्वास मोठा आहे. लहानपणी एका हाताने काम करताना अनेक अडचणी आल्या, पण तो योद्ध्यासारखा लढला. अपंगत्व मागे सारून उजव्या हाताने कॅचेस घेतो आणि चेंडू थ्रोदेखील करतो. इतकेच नव्हे तर होम रनदेखील दमदारपणे घेतो. हे करताना हातातील ग्लोज डोळ्यांची पापणी लागण्याआधीच सफाईदारपणे बदलतो देखील. माझ्या प्रवासात सहकाऱ्यांकडून मिळालेले प्रोत्साहन मोलाचे ठरले, असे अभिजित सांगतो. ‘लोकमत’शी बोलताना तो म्हणाला, ‘फिल्डवर सहकारी खेळाडू आणि कोचचे सातत्याने सहकार्य लाभते.’ अभिजितला मिळाले घर...अभिजित दोन वर्षांआधीपर्यंत बेघर होता. महाराष्ट्र सॉफ्टबॉलचे संयुक्त सचिव डॉ. सूरज येवतीकर यांच्या प्रयत्नांनी एक हजार चौरस फुटांचा भूखंड आणि त्यावर घराचे बांधकाम करून ते अभिजितला देण्यात आले. घराचा प्रश्न तर सुटला; पण नोकरीचा कायम आहे. दिल्लीतील लीगदरम्यान अमेरिकन दूतावासातील अधिकारी अभिजितच्या खेळामुळे कमालीचे प्रभावित झाले. त्यांनी अभिजितला यापुढील परदेश दौऱ्यात खेळाचा खर्च दूतावास उचलेल, असा शब्द दिला. या प्रोत्साहनामुळे अभिजित सुखावला आहे. आता तो भारतीय सॉफ्टबॉल संघाच्या परदेश दौऱ्याच्या प्रतीक्षेत कसून सरावात व्यस्त आहे.