साहेबराव नरसाळे, अहमदनगरकोल्हापूरच्या नंदू आबदार, सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडे, मुंबईच्या राजेंद्र राजमाने, औरंगाबादच्या अक्षय वाघ, पुण्याच्या सचिन यलभर यांनी गादी विभागात जोरदार खेळ करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़ तर माती विभागात नगरच्या योगेश पवार, सोलापूरच्या अतिश मोरे, बीडच्या गोकुळ आवारे, मुंबईच्या योगेश बोंबाळे यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़५८ वी राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी केसरी किताबासाठी नामांकित मल्लांच्या लढती झाल्या़ कोल्हापूरच्या नंदू आबदार आणि ठाण्याच्या हरेल थोरात यांच्यामधील लढत चांगलीच रंगली़ नंदू आबदार हा मागील वर्षी उपमहाराष्ट्र केसरी ठरला आहे़ त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते़ नंदू आबदारचे नाव पुकारताच विंगेपर्यंत प्रेक्षकांनी धाव घेतली़ हरेल थोरात याने जोरदार प्रतिकार करीत नंदू आबदारचा घाम काढला़ आबदारने भारंदाज, एकेरी व दुहेरी पट काढीत दहा गुणांची कमाई केली़ निर्धारित वेळेत हरेल थोरात याला चितपट करण्यात आबदारला यश आले नाही़ मात्र, उत्कंठावर्धक ठरलेल्या या लढतीत दहा गुणांच्या जोरावर नंदू आबदार विजेता ठरला़परभणीच्या संभाजी शिंदे याने जालन्याचा रामेश्वर कोकरे याच्यावर दहा गुणांनी विजय मिळविला़ रायगडच्या अंकुर घरतने २० सेकंदात वर्ध्याचा सुरज कोसुळकर याला एकेरीपट काढून अस्मान दाखविले़नाशिकच्या गौरव गणोरे याने नागपूरच्या रामचंद येगर याचा ११-०ने पराभव केला़ भारंदाज लावून गौरवने पहिल्या ३ मिनिटातच मोठी आघाडी घेतली होती़ त्यानंतर खचलेल्या येगरला एकाही गुणाची कमाई करता आली नाही़
सोलापूर, कोल्हापूरचे वर्चस्व
By admin | Published: December 27, 2014 2:07 AM