शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

बेटा दत्तू, देशासाठी पदक घेऊनच ये...

By admin | Published: July 30, 2016 5:24 AM

स्मृतिभंशामुळे सुमारे तीन महिन्यांपासून अंथरूणावर खिळलेली आई... वडील नसल्याने आईचाच काय तो एकमेव आधार... अशातही आई ओळखत नसल्याची आॅलिम्पिकपटू

- राकेश जोशी,  नाशिक

स्मृतिभंशामुळे सुमारे तीन महिन्यांपासून अंथरूणावर खिळलेली आई... वडील नसल्याने आईचाच काय तो एकमेव आधार... अशातही आई ओळखत नसल्याची आॅलिम्पिकपटू मुलाला असलेली खंत... अन् चमत्कार घडावा त्याप्रमाणे आईने आॅलिम्पिक स्पर्धेतून पदक पटकाविण्यासाठी भरभरून दिलेला आशिर्वाद असा दुर्मीळ अन् तितकाच हृदयद्रावक प्रसंग शुक्रवारी घडला. ही कहाणी आहे, रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील रोर्इंग अर्थात नौकानयन स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाशिक जिल्ह्यातील तळेगाव रोहीचा जवान दत्तू भोकनळ आणि त्याच्या आईची. त्याचे झाले असे, साधारण तीन महिन्यांपूर्वी दत्तू कोरिया येथे फिसा आशिया अ‍ॅण्ड ओशियाना कॉण्टिनेण्टल आॅलिम्पिक क्वॉलिफिकेशन स्पर्धेसाठी रवाना झाला. त्यावेळी त्याची आई आशाबाई ऊर्फ अक्का या घरात पाय घसरून पडल्याने झालेल्या अपघातात जखमी झाल्या. अपघात वरवर किरकोळ वाटत असला तरी त्यात त्यांना मेंदूला मार लागल्याने त्यांचा स्मृतिभंश झाला. त्या परिचितांना ओळखूही शकत नव्हत्या. त्यांना तातडीने लष्कराच्या पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्याच्या आनंदात दत्तू जेव्हा आईला पेढा भरविण्यासाठी घरी पोहोचला तेव्हासुद्धा दुर्दैव आड आले. दत्तूला आईने ओळखलेच नाही. दरम्यानच्या काळात उपचार सुरूच होते. काही काळानंतर आॅलिम्पिक स्पर्धेसाठी दत्तू रवानादेखील झाला. या काळात त्याने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आईशी संपर्क साधला असला तरी दैव त्याला साथ देत नव्हते. अखेर तो सुदिन उजाडला. शुक्रवारी दत्तूने नेहमीप्रमाणे आईशी फोनवरून संवाद साधला असता रूग्णालयातील उपचार आणि दैव बलवत्तर म्हणा आईने हळूहळू का होईना पण आपल्या दत्तूला ओळखले. आई ‘अक्का’ यांनी या संवादात दत्तूला आॅलिम्पिक स्पर्धेसाठी नुसत्याच शुभेच्छा दिल्या असे नाही तर ‘बेटा, देशासाठी पदक पटकावून आणच...’ असा भरभरून आशीर्वाददेखील दिल्याचे दत्तूचे मामा रवींद्र वाकचौरे यांनी सांगितले. दत्तू भोकनळ हा रोर्इंगपटू सध्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी अमेरिकेत सराव करत आहे. आज आईने आपल्याला सुमारे चार महिन्यांनंतर ओळखल्याने आपल्या आनंदाला पारावार राहिला नसून, आत्मविश्वासातदेखील तितकीच भर पडल्याने देशासाठी अन् आईसाठी पदक पटकाविण्यासाठी मेहनत घेत असल्याचे दत्तूने स्पष्ट केले.