- सचिन कोरडेपणजी : जगज्जेत्या विश्वनाथन आनंदलाही यापूर्वी इतका ‘आनंद’ झाला नसेल जो यावेळी झाला. कारण ऑनलाईन पद्धतीने खेळत भारताने ऑलिम्पियाड स्पर्धेचे संयुक्त विश्वविजेते होण्याचा मान मिळवला. बुद्धिबळातील हा एक ऐतिहासिक ‘ऑनलाईन’ विजय ठरला. मात्र, ऑनलाईन खेळ करताना अडचणींचा सामना करण्याचे धैर्यही तितकेच असावे लागते. याचा प्रत्यय भारतीय संघातील प्रत्येकाला आला.शेवटच्या फेरीत भारत विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर होता. अशावेळी अचानक सर्व्हर बंद पडलाआणि जवळपास पाऊण तास वाया गेला. वेळ वाया गेल्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला मिळणार होता. मात्र संघातील दोन खेळाडूंनी फिडेकडे समस्या मांडल्याने भारताला न्याय मिळाला आणि टीमने एकच जल्लोष केला. ऑलिम्पियाड संघात भारताचे प्रतिनिधित्व करणारी गोव्याची महिला ग्रॅण्डमास्टर भक्तीने ‘लोकमत’ शी आपला अनुभव शेअर केला. ती म्हणाली, लॉकडाऊननंतर आम्ही बऱ्याच ऑनलाईन स्पर्धा खेळलो. मात्र त्याचा इतका दबाव नव्हता. एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या विजयानजीक पोहचल्यानंतर अशा प्रकारची तांत्रिक अडचण निर्माण झाली तर त्याचे खूप वाईट वाटते. परंतु, फिडेने आमच्यावर अन्याय होऊ दिला नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. संयुक्त विश्वविजेतेपदाचा निर्णय होताच आम्ही एकच जल्लोष केला. व्हिडिओ कॉलवर सर्वांशी चर्चा केली. विश्वनाथन आनंद यांनी आम्हा सर्वांचे कौतुक केले. निश्चितच, माझ्यासारख्या खेळाडूसाठी हा अविस्मरणीय क्षण होता. या स्पर्धेपूर्वी आम्ही काही सराव सामने खेळलो. मात्र तो एक वैयक्तीक अभ्यास होता. मी रघुनंदन गोखले सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. तेही उपयोगी ठरले.१ लाख लोक पाहत होते सामनेबुद्धिबळ या खेळाशी संबंधित असणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. देश-विदेशातील खेळाडू, प्रशिक्षक तसेच क्रीडाप्रेमी आॅनलाईन आॅलिम्पियाड स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहत होते. जवळपास १ लाखांहून अधिक लोक ‘यु ट्युब’ या चॅनेलवर सामने पाहत होते. त्यामुळे आम्हाला मोठी प्रेरणा मिळत होती. अनेक जण काही सल्लेही देत होते. या खेळाला फॉलो करणाºयांची संख्या मी तरी एवढी बघितली नव्हती. त्यामुळे या खेळाची लोकप्रियताही आम्हाला जाणवली. मी प्रत्येकाची आभारी आहे. या सर्वांचा पाठिंबा होता म्हणून आमचा संघ विश्वविजेता ठरला.कोविडचा परिणाम पण...कोविडमुळे सगळे क्रीडा क्षेत्रच हादरले आहे. मात्र, आम्ही फिडेचे खूप आभारी आहोत. कारण त्यांनी विश्व बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने विविध स्पर्धा आॅनलाईन पद्धतीने आयोजित केल्या. आॅनलाईन आॅलिम्पियाडचाभाग झाल्याचाही अभिमान आहे. बुद्धिबळ हा खेळ इंटरनेटच्या माध्यमातून खेळला जाऊ शकतो. त्यामुळे या खेळाचा आनंद घेता आला.
‘सर्व्हर’ बंद पडताच ‘टीम इंडिया’त वाढली होती चिंता!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 3:16 AM