सरिताचे एआयबीएला पत्र : जे काही घडले ते घडायला नको होते; कृतीचा पश्चात्ताप
नवी दिल्ली : महिला बॉक्सर एल. सरितादेवीने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाला (एआयबीए) निलंबनाची कारवाई रद्द करण्याची विनंती केली आहे. पोडियमवर घडलेल्या कृतीचा पश्चात्ताप होत असून, पुन्हा अशी कृती घडणार नाही, असे सरिताने एआयबीएला लिहिलेल्या पत्रत म्हटले आहे.
इंचियोन आशियाई स्पर्धेत उपांत्य फेरीत वादग्रस्तरीत्या पराभूत झाल्यानंतर सरिताने कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे एआयबीएने सरितावर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे सरिताची पुढील महिन्यात आयोजित विश्वचॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याची आशा धूसर झाली आहे. माजी विश्व व आशियाई चॅम्पियन सरिताने एआयबीएच्या नोटीसला उत्तर देताना पत्रत म्हटले आहे, की ‘जे काही घडले ते घडायला नको होते. मला या कृत्याचा पश्चात्ताप होत आहे. भविष्यात असे कृत्य माङयाकडून घडणार नाही, असा संकल्प करते. चूक उमगल्यानंतर मी आशियाई ऑलिम्पिक परिषद व आशियाई खेळ 2क्14 च्या आयोजन समितीला माफीनामा सादर केला आणि कांस्यपदक स्वीकारले.’ माङयाबाबतचा निर्णय घेताना माङया यापूर्वीच्या कारकीर्दीबाबत विचार करावा, अशी विनंती सरिताने एआयबीएच्या शिस्तपालन समितीला पाठविलेल्या पत्रत केलेली आहे. (वृत्तसंस्था)
14 वर्षाच्या कारकीर्दीत राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये माङयाकडून कधीच शिस्तीचा भंग झालेला नाही. 2क्क्1 मध्ये अमेरिकेमध्ये प्रथमच विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाली होती. विश्व बॉक्सिंग वतरुळामध्ये ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले. इंचियोनमध्ये घडलेल्या घटनेबाबत या पत्रद्वारे माफी मागत आहे. पोडियममध्ये घडलेली कृती पूर्वनियोजित नव्हती. त्यासाठी पती किंवा रिंगमध्ये उपस्थित तीन प्रशिक्षकांनी प्रेरित केलेले नव्हते. माङया पतीला एआयबीएच्या तांत्रिक प्रतिनिधींच्या उपस्थितीबाबत कल्पना नव्हती. ते त्यांना आशियाई स्पर्धेचे आयोजक समजत होते.
4नवी दिल्ली : एल. सरिता देवी हिच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याची विनंती बॉक्सिंग इंडियाच्या अध्यक्ष संदीप जाजोदिया यांनी एआयबीएला केली आहे. भारतीय बॉक्सर्सने कुठलीच अट न घालता माफी मागितली असून, यापूर्वी ती कुठल्याही वादामध्ये अडकलेली नाही, ही विश्व बॉक्सिंग महासंघापुढे सरिसासाठी जमेची बाजू आहे, असेही जाजोदिया म्हणाले.
4इंचियोन आशियाई स्पर्धेत उपांत्य फेरीत वादग्रस्तरीत्या पराभूत झाल्यानंतर कांस्यपदक स्वीकारण्यास नकार देणा:या सरितावर अस्थायी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे सरिताला 19 नोव्हेंबरपासून कोरियातील जेजू द्वीपमध्ये सुरू होणा:या
विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याची आशा धूसर झाली आहे.
4पोडियमवर सरिताने विरोध दर्शविल्यानंतर एआयबीएने कडक पाऊल उचलताना निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर क्रीडा मंत्रलय व भारतीय ऑलिम्पिक संघटनेने भविष्यातील रणनीती तयार करण्यासाठी आज बैठक घेतली.
4बैठकीमध्ये सहभागी
झालेले जाजोदिया म्हणाले,
‘‘ही भावनात्मक कृती होती. पराभवामुळे निराश झाल्यामुळे सरिताकडून ही कृती घडली.
हे मुद्दाम केलेले कृत्य
नव्हते. खेळाडूने आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यासाठी खेळाडूने कुठलीच अट न घालता माफी मागितली
आहे. यापूर्वी या खेळाडूकडून अशी कृती कधीच घडलेली नाही. त्यामुळे या घटनेचा सहानुभूतीने विचार करणो आवश्यक आहे. एआयबीएने स्पष्टीकरण मागितले असून, आम्ही ते आज पाठवीत आहोत.’’