-दिनेश गुंडआंतरराष्ट्रीय कुस्ती पंच
राजू आवळेच्या रणहलगीचा गजर, बाबाजी लिम्हण यांच्या सुरेख निवेदनाचा भरदार आवाज आणि मल्लांच्या शड्डूने आज भूगावमध्ये ६१वी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेस प्रारंभ झाला.वसंतऋतूच्या आगमनाने जशी सृष्टी बहरून जाते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ४५ जिल्ह्यांतून आलेल्या ९०० कुस्तीगिरांच्या आगमनाने भूगाव बहरून गेले आहे. आज सकाळी ८ वाजताच प्राथमिक फेरीच्या ५७, ७४ व ७९ किलो वजन गटातील चुरशीच्या लढतींनी स्पर्धेस सुरुवात झाली.सकाळच्या सत्रातील पंचांचे अचूक निर्णय भूगावकर ग्रामस्थांचे सुंदर नियोजन यामुळे स्पर्धेत खूपच रंगत निर्माण झाली.७४ किलो वजन गटाच्या एका रोमहर्षक लढतीत राज्य अजिंक्यपद स्पर्धेत फ्रीस्टाइल प्रकारात ९ सुवर्णपदके मिळवणारा रणजित नलावडे याची विजयी घोडदौड रोखण्याचा प्रयत्न पुणे जिल्ह्याच्या अक्षय चोरघेने केला. परंतु आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करत एकेरीपट, भारंदाज या डावांचा उपयोग करून रणजितने ही लढत ७ विरुद्ध २ गुणांनी एकतर्फी जिंकत आपले आव्हान कायम ठेवले.५७ किलो वजन गटाच्या तिसºया फेरीत सातारा जिल्ह्याच्या प्रदीप सूळने मिळविलेला विजय कुस्ती शौकिनांच्या मनावर कोरला जाईल इतका अविस्मरणीय होता. प्रदीप सूळने पुणे जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वप्नील शेलार याला लावलेली ढाक आणि मोठा डाव अतिशय अप्रतिम होता. ही लढत चुरशीची होईल असे वाटत असतानाच ती लढत १३-२ अशा फरकाने प्रदीप सूळने एकतर्फी तांत्रिक गुणाधिक्यावर जिंकली.या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय विजेते ज्योतिबा अटकळे, तुकाराम शितोळे, सागर लोखंडे, सोनबा गोंगाणे तर आंतरराष्ट्रीय खेळाडू सूरज कोकाटे, सौरभ इगवे, आदर्श गुंड हे आपल्या वर्षभर केलेल्या तपश्चर्यचे फळ मिळविण्यासाठी आतुर आहेत.‘मंथुनी नवनिता तैसे घे अनंता’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक फेरीनुसार चांगले कुस्तीगीर पदकाच्या दिशेने आगेकूच करत आहेत.मुळशी तालुका म्हणजे कुस्तीचे आगार. येथे घरटी एक पहिलवान.महाराष्टÑ केसरी स्पर्धेत अनेकांनी भाग घेतलेला आणि या स्पर्धा गाजविलेल्याही. स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या तालुक्यातील भूगाव येथे होणाºया यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक जुन्या पहिलवानांच्या आठवणी जाग्या झाल्या. कुस्तीची मोठी परंपरा आहे. यंदाच्या स्पर्धेच्या कुस्तीची परंपरा असलेल्या मुळशी आणि प्रामुख्याने मामासाहेब मोहोळ यांच्या गावात होत असलेल्या या महाराष्टÑ केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाने त्या भागातील माजी कुस्तीगीर यांनी व्यक्त केलेल्या आपल्या भावना...मला ही स्पर्धा पाहताना खूप आनंद होतोय. तरुण वयात केलेल्या लढतींचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले आहे. गुलाब भिंताडे यांच्याबरोबर झालेली माझी कुस्ती ही जीवनातील सर्वांत रोमहर्षक लढत होती.- दशरथ इंगवले (वय ८०), भूगाव