शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

सौरव घोषालचे विक्रमी विजेतेपद

By admin | Published: July 18, 2016 10:01 PM

भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषाल आणि दिपिका पल्लीकल यांनी आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या अनुक्रमे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १८ -  भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषाल आणि दिपिका पल्लीकल यांनी आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकावले. सौरवला विजेतेपदासाठी हरींदरपाल सिंग संधूविरुद्ध पाच सेटपर्यंत झुंजावे लागले. तर, तब्बल ५ वर्षांनी राष्ट्रीय स्पर्धेत खेळत असलेल्या दिपिकाने गतविजेत्या जोश्ना चिनप्पाला चार सेटच्या लढतीत नमवले.मुंबईतील ओट्टर्स क्लबमध्ये झालेल्या या लढतीत सौरवने पहिला सेट जिंकून आश्वासक सुरुवात केली. मात्र यानंतर हरींदरपालने सलग दोन सेट जिंकताना २-१ अशी आघाडी घेतली. यावेळी काहीसा दबावाखाली आलेल्या सौरवने सावध सुरुवात करताना मोक्याच्यावेळी खेळ उंचावर सौरवने हरींदरपालवर वर्चस्व राखले आणि ११-७, ७-११, ३-११, ११-८, १४-१२ असा झुंजार विजय मिळवत ११व्य्यांदा राष्ट्रीय जेतेपद पटकावले.दुसरीकडे महिलांमध्ये विक्रमी १५व्या राष्ट्रीय विजेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या चिनप्पाला पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवरातील १९व्या स्थानी असलेल्या दिपिका पल्लीकलने पहिला सेट गमावल्यानंतर नियंत्रित खेळ करताना अग्रमानांकीत आणि गतविजेत्या चिनप्पाला ४-११, ११-६, ११-२, ११-८ असा पराभवाचा धक्का दिला. (क्रीडा प्रतिनिधी)मी अनेकवेळा राष्ट्रीय फायनल खेळलो आहे. मात्र हरींदरपालविरुध्द खेळणे खूप आव्हानात्मक होते. माझ्यासाठी ही लढत खूप कठीण होती आणि मी त्याचा पुर्ण आनंद घेतला. - सौरव घोषालमी अंतिम लढतीसाठी कोणतीही रणनिती आखली नव्हती. केवळ माझा नैसर्गिक खेळ करताना बाजी मारली. खूप मोठ्या कालावधीनंतर मिळालेल्या या यशाने मी संतुष्ट आहे. या विजेतेपदामुळे माझा आत्मविश्वास वाढला असून राष्ट्रकुल स्पर्धेत माझे सुवर्णपदक कायम राखण्यासाठी मी उत्सुक आहे. यासाठीची तयारी मी सुरु केली आहे.- दिपिका पल्लीकल