शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ३७ धावांनी विजय

By admin | Published: March 20, 2016 4:50 PM

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर दक्षिण आफ्रिकेने आपले विजयाचे खाते उघडले आहे. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तावर ३७ धावांनी विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - आयसीसी  टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर दक्षिण आफ्रिकेने आपले विजयाचे खाते उघडले आहे. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तावर ३७ धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येचा पाठलाग करतान अफगाणिस्तानचा डाव १७२ धावांवर संपुष्टात आला.
 
दक्षिण आफ्रिकेने निर्धारीत वीस षटकात पाच बाद २०९ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर मोहोम्मद शहजादने १९ चेंडूत ४४ धावा फटकावून दमदार सुरुवात करुन दिली होती. मात्र नंतर आलेल्या फलंदाजांना तसेच सातत्य टिकवता न आल्याने अफगाणिस्तानचा पराभव झाला. मात्र नवख्या अफगाणिस्तानने या सामन्यात चांगली लढत दिली.
 
शहजाद व्यतिरिक्त सलामीवीर नूर अली झादरान २५, गुलबदीन २६ आणि शेनवारीने २५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नवख्या अफगाणिस्ताननेही दमदार सुरुवात केली होती अफगाणिस्तानने दहा षटकात १०० धावांचा टप्पा पार केला होता.
 
सलामीवीर मोहोम्मद शहजादने १९ चेंडूत ४४ धावा फटकावून दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या २२ चेंडूत अफगाणिस्तानच्या ५० धावा फलकावर लागल्या. पहिल्या विकेटसाठी मोहोम्मद शहजाद आणि नूर अली झादरानने ५२ धावांची सलामी दिली. 
 
शहजादला ४४ धावांवर मॉरिसने बाद केले. त्यानंतर कर्णधार असगर स्टानिकझायही लवकर बाद झाला. त्याने ७ धावा केल्या. १०५ धावांवर गुलबदीनच्या रुपाने अफगाणिस्तानला तिसरा धक्का बसला. त्याने २६ धावा केल्या. त्याने नूर अली बरोबर तिस-या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेचा मॉरिस सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात २७ धावा देत चार गडी बाद केले. 
 
स्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सच्या २९ चेंडूतील ६४ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने टी-२० वर्ल्डकपच्या सलग दुस-या सामन्यात २०० धावांचा टप्पा ओलांडला. दक्षिण आफ्रिकेने निर्धारीत वीस षटकात पाच बाद २०९ धावा केल्या. 
 
अफगाणिस्तानला विजयासाठी २१० धावांचे लक्ष्य दिले होते. डिविलियर्सने डावाच्या १६ व्या षटकात २९ धावा वसूल केल्या. डिविलियर्सला ६४ धावांवर मोहोम्मद नाबीने बाद केले. सलामीवीर क्विंटन डिकॉक ४५, ड्यु प्लेसिस ४१ आणि डयुमिनीच्या नाबाद २९ धावा केल्या.  पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला इंग्लंड विरुद्ध २२५ पेक्षा जास्त धाव करुनही विजय मिळवता आला नव्हता.