शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

दक्षिण आफ्रिका ‘अ’ची शानदार सुरुवात

By admin | Published: August 18, 2015 10:46 PM

मधल्या फळीतील फलंदाज ओम्पिलो रामेलाचे शतक व आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने

वायनाड : मधल्या फळीतील फलंदाज ओम्पिलो रामेलाचे शतक व आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने आजपासून प्रारंभ झालेल्या पहिल्या चारदिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात दिवसअखेर ४ बाद २९३ धावांची मजल मारली. दिवसअखेर बाद होण्यापूर्वी रामेलाने ११२ धावांची खेळी केली. सलामीवीर रिजा हेंड्रिक्स (५०) आणि तांबे बावुमा (नाबाद ५५) यांनीही अर्धशतके झळकावली. रामेला व बावुमा यांनी चौथ्या विकेटसाठी १३६ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी बावुमाला दुसऱ्या टोकाकडून नाईट वॉचमन डेन पीट खाते न उघडता साथ देत होता. आघाडीचे काही खेळाडू सीनिअर संघात सामील झाल्यामुळे कमकुवत झालेल्या भारत ‘अ’ संघाच्या गोलंदाजांना छाप पाडता आली नाही. फिरकीपटू अक्षर पटेल आतापर्यंत सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने ५२ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. जयंत यादव व ईश्वर पांडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने कृष्णागिरी स्टेडियमच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर शानदार सुरुवात केली. हेंड्रिक्स व स्टीयान वान जिल (२८) यांनी सलामीला ६० धावांची भागीदारी केली. आॅफस्पिनर जयंत यादवने वान जिलला माघारी परतवत भारताला पहिले यश मिळवून दिले. वैयक्तिक अर्धशतक झळकावल्यानंतर हेंड्रिक्स ईश्वर पांडेचे लक्ष्य ठरला. त्या वेळी दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची २ बाद १०० अशी स्थिती होती. हेंड्रिक्सने अर्धशतकी खेळी ७ चौकार व २ षटकारांनी सजवली. त्यानंतर रामेलाने डाव सावरला. त्याने थेनिस डी ब्रुएनच्या (३८) साथीने तिसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. रामेलाने पांडेच्या गोलंदाजीवर षटकार वसूल करीत प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पाचवे शतक पूर्ण केले. दिवसाच्या ८८ व्या षटकात पटेलने रामेलाला माघारी परतवले. रामेलाने शतकी खेळीत १२ चौकार व ३ षटकार मारले. (वृत्तसंस्था)