ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २५ - नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेला वीस षटकात १२२ धावांच करता आल्या आणि वेस्ट इंडिजला १२३ धावांचे माफक लक्ष्य मिळाले.
सलामीवीर डि कॉकच्या ४७ धावा आणि विसेच्या २८ धावा या दोघांचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिकेचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. रसेल, गेल आणि ब्राव्होने प्रत्येकी दोन गडी बाद केले. डि कॉक आणि विसेमध्ये सहाव्या विकेटसाठी झालेली ५० धावांची भागीदारी दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक भागीदारी ठरली.
हा सामना जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजचे उपांत्यफेरीतील स्थान पक्के होणार आहे तर, दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे.