जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या अपिलीय न्यायालयाने पॅरा धावपटू आॅस्कर पिस्टोरियसला त्याची गर्लफ्रेंड रिवा स्टीनकेम्पच्या हत्येप्रकरणी १३ वर्षे पाच महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. त्याला या आधी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.ब्लोमफोंटेनमध्ये सुप्रीम कोर्ट आॅफ अपिलने ब्लेड रनर पिस्टोरियसची शिक्षा दुप्पट केली. अभियोजकांनी याबाबत न्यायालयात म्हटले की, रिवाला मारल्यानंतर पिस्टोरियसला खेद झाल्याचे त्याच्या आचरणातून जाणवले नाही.’ अभियोजकांच्या बाजूने आंद्रिया जॉनसन यांनी सांगितले की, गुन्ह्याची गंभीरता पाहून शिक्षा अशी व्हायला हवी, की त्यातून इतरांनी बोध घ्यावा.’पिस्टोरियसने स्टीनकेम्पची हत्या २०१३ मध्ये ‘व्हॅलेनटाईन डे’ला केली होती. त्यात त्याने बाथरूममध्ये तिच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर पिस्टोरियसने म्हटले की,‘त्याने चोर समजून गोळ्या झाडल्या होत्या.’
दक्षिण आफ्रिकेच्या अपिलीय न्यायालयाने पॅरा धावपटू आॅस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत केली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 3:53 AM