शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

दक्षिण आफ्रिकेचा शानदार विजय

By admin | Published: January 18, 2015 12:08 AM

भेदक मारा या बळावर दक्षिण आफ्रिकेने पावसाचा अडथळा आलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजला ६१ धावांनी धूळ चारली़

डरबन : एबी डिव्हिलियर्स (६६), हाशिम आमला (८१), डेव्हिड मिलर (७०) यांची शानदार अर्धशतके आणि डेल स्टेन, वर्नोन फिलँडर, इम्रान ताहीर (प्रत्येकी ३ बळी) यांचा भेदक मारा या बळावर दक्षिण आफ्रिकेने पावसाचा अडथळा आलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजला ६१ धावांनी धूळ चारली़ दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४८़२ षटकांत ८ बाद २७९ धावा केल्या होत्या़ तेव्हा पावसामुळे सामना रोखण्यात आला़ यानंतर विंडीजसमोर विजयासाठी ३२ षटकांत २२५ धावांचे कठीण आव्हान ठेवले़ प्रत्युत्तरात ख्रिस गेलने आपल्या स्फोटक शैलीत फलंदाजी करताना पहिल्या विकेटसाठी ६ षटकांत ५१ धावांची भागीदारी रचली़ त्याने अवघ्या २४ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावांची आक्रमक खेळी केली़ तो डेल स्टेनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक एबी डिव्हिलियर्सकडे झेल देऊन बाद झाला़यानंतर आफ्रिकेच्या वर्नोन फिलँडरने पुढच्याच षटकात लियॉन जॉन्सनला तंबूचा रस्ता दाखविला़ यानंतर मात्र विंडीज संघाचे गडी नियमित अंतराने बाद होत गेले़ अखेर हा संघ २८़२ षटकांत १६४ धावांत गारद झाला़ डिव्हिलियर्स या सामन्याचा मानकरी ठरला़ त्याआधी हाशिम आमला, डिव्हिलियर्स आणि मिलर यांच्या अर्धशतकांच्या बळावर १़५ षटकांचा खेळ शिल्लक असताना ८ बाद २७९ धावांपर्यंत मजल मारली़ दक्षिण आफ्रिकेने पहिले २ बळी लवकरच गमावले़ यानंतर डिव्हिलियर्सने आमलासह तिसऱ्या गड्यासाठी ९९ आणि मिलरसोबत चौथ्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी करताना संघाला संकटातून बाहेर काढले़ ५४ धावा पूर्ण करताच आमलाने १०४ सामन्यांत ५ हजार धावांचा पल्ला पूर्ण केला.मिलरने वेगाने धावा बनविताना ६८ चेंडूंत ७० धावांची खेळी साकारली़ तो बाद झाल्यानंतर मात्र आफ्रिकेची धावसंख्या मंदावली़ त्यांना अखेरच्या ९़१ षटकांत ४१ धावाच करता आल्या़ त्यांनी चार गडीही गमावले़ वेस्ट इंडिजकडून जेरोम टेलर आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले़ (वृत्तसंस्था)च्दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशिम आमलाने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगाने ५ हजार धावा पूर्ण करण्याचा व्हिवियन रिचर्डस् आणि विराट कोहली यांचा विक्रम मागे टाकला आहे़ च्३१वर्षीय आमलाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन-डेत ६६ धावांची शानदार खेळी केली़ त्याने ५४वी धाव घेत हा पराक्रम आपल्या नावे केला़ त्याने १०१व्या डावात हा पल्ला पूर्ण केला.च्रिचर्डस्ने १२६ सामन्यांतील ११४ डावांत, तर विराटने १२० सामन्यांतील ११४ डावांत ५ हजार धावांचा पल्ला गाठण्याची किमया साधली होती़ मात्र आता कमी डावांत वन-डेत ५ हजार धावांचा पल्ला पूर्ण करण्याचा विक्रम आमलाने आपल्या नावे केला आहे़