क्रीडा प्रबोधिनी, पोलीस उपांत्य फेरीत महापौर चषक हॉकी : एसआरपीएफ, इन्कमटॅक्स अंतिम चारांत
By admin | Published: March 03, 2016 1:57 AM
पुणे : महापौर चषक हॉकी स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी, सिटी पोलीस, एसआरपीएफ, इन्कमटॅक्स संघांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत क्रीडा प्रबोधिनीने पेनल्टी शूट आउटमध्ये अस्पात ॲकॅडमीवर ५-२ने मात केली. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरी सुटला. अस्पातच्या सचिन भोसलेने योगेश पाठकच्या पासवर गोल करीत संघाला आघाडीवर नेले. मात्र, ...
पुणे : महापौर चषक हॉकी स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी, सिटी पोलीस, एसआरपीएफ, इन्कमटॅक्स संघांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत क्रीडा प्रबोधिनीने पेनल्टी शूट आउटमध्ये अस्पात ॲकॅडमीवर ५-२ने मात केली. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरी सुटला. अस्पातच्या सचिन भोसलेने योगेश पाठकच्या पासवर गोल करीत संघाला आघाडीवर नेले. मात्र, क्रीडा प्रबोधिनीच्या रशिद मुजावर (८ मि.) व हरीश शिंदगी (११ मि.) यांनी गोल करीत आघाडी २-१ अशी आघाडी घेतली. अल्लाउद्दीन शेखने (३४ मि.) संजय महाब्दीच्या पासवर गोल करीत अस्पातला बरोबरी साधून दिली. शूटआऊटमध्ये क्रीडा प्रबोधिनीने बाजी मारली. सिटी पोलीस संघाने पुणे मॅजिशियनला १-०ने नमविले. गणेश गिरी गोसावीने (४० मि.) गौरव कांबळेने दिलेल्या पासवर गोल करीत संघाला मिळवून दिलेली १-० आघाडी निर्णायक ठरली. एसआरपीएफने खडकी युनायटेडला ४-१ने सहज नमवीत आगेकूच केली. संदेश मोरे (१३ व २७ मि.), सूरज शाही (३६ व ५२ मि.) यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या बळावर एसआरपीएफने खडकी युनायटेडला ४-१ने नमविले. प्रवीण पाटील, राहुल राणे, मिलिंद मलाई व सागर कदम यांनी गोलमध्ये साहाय्य केले. खडकीकडून ऋषभ आव्हाडने (४९ मि.) एकमेव गोल केला. इन्कमटॅक्स संघाने बीईजीला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ने मात केली. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला. उपांत्य फेरीत क्रीडा प्रबोधिनी व सिटी पोलीस, इन्कमटॅक्स व एसआरपीएफ संघात लढत होणार आहे. एस विशाल २ मार्च हॉकी : क्रीडा प्रबोधिनी (हिरवी जर्सी) व अस्पात संघातील खेळाडूंमध्ये चेंडूचा ताबा मिळविण्यावरून झालेली चुरस.