शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

स्पोर्ट/सर्वआवृत्ती: सुवर्ण कन्या मोनिकाने दिवस गाजविला राज्यस्तरीय शालेय (१९ वर्षाआतील) वेटलिफ्टिंग स्पर्धा

By admin | Published: December 20, 2014 10:27 PM

ॲड़ नीलिमा शिंगणे

ॲड़ नीलिमा शिंगणे
अकोला: गतवर्षी आसामला झालेल्या राष्ट्रीय शालेय (१९ वर्षाआतील) वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारी मनमाडची मोनिका कडनोर हिने राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेचा दुसरा दिवस गाजविला. शनिवारी वसंत देसाई क्रीडांगण बहूद्देशीय सभागृहात पार पडलेल्या ५३ किलो वजनगटात नाशिकचे प्रतिनिधित्व करीत मोनिकाने ५८ स्नॅच आणि ७० क्लिन ॲन्ड जर्क उचलून प्रथम स्थान मिळवून, राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केले.
याच गटात बुलडाण्याच्या शारदा पसरटे हिने द्वितीय स्थान मिळविले. पुण्याची कोमल पवार हिने तिसरे स्थान पटकाविले. ४८ किलो वजनगटात सोलापूरच्या करुणा सोनवले हिने प्रथम, नाशिकची खुशाली गांगुर्डे हिने द्वितीय आणि नागपूरच्या तनू रंगारी हिने तिसरे स्थान मिळविले. ५८ किलो वजनगटात कोल्हापूरच्या श्रद्धा पवारने नागपूरच्या प्रगती चौरेवर मात करीत प्रथम स्थान मिळविले. ६३ किलो वजनगटात नाशिकच्या नीलम शेळके हिने पुण्याच्या तैसिम शेखला पिछाडीवर ठेवले. नागपूरच्या पायल टुले हिने तृतीय स्थान मिळविले. मुलींच्या गटातील ७५ किलो वजनगटातील फेरी सायंकाळी सुरू होती.
मुलांच्या गटात झालेल्या अंतिम फेरीत ५६ किलो वजनगटात शुभम तोडकर पुणे याने प्रथम स्थान पटकाविले. कोल्हापूरचा स्वस्तिक पाटील द्वितीय ठरला. मुंबईचा किरण लोखंडे तिसरा राहिला. ६२ किलो वजनगटात क्रीडा प्रबोधिनीचा सुमित पाटील प्रथम, कोल्हापूरचा संकेत सदलगे कोल्हापूर, नाशिकचा अतुल महाजन तिसरा ठरला. ६९ किलो वजनगटात अमित बडगुले प्रथम त्याचाच संघ सहकारी समाधान बडगर द्वितीय स्थानावर राहिला. नाशिकचा निशीकांत पाटील याने तृतीय स्थान मिळविले. स्पर्धेत पहिल्या दिवशी मुलींमध्ये नाशिक तर मुलांच्या गटात कोल्हापूर विभाग संघाने आघाडी घेतली आहे.
स्पर्धेत पंच म्हणून सुरेश कुंभार, प्रवीण व्यवहारे, सुशील मोहोड, संजय झोरे, बिहारीलाल दुबे, शरद काळे, धैर्यशील, पंकज बांबळे काम पाहत आहे.
बॉक्स
स्टार ऑफ द डे
मनमाडची मोनिका संपत कडनोर इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. वयाच्या दहाव्या वर्षांपासून तिनं मैत्रिणींच्या सांगण्यावरून वेटलिफ्टिंग खेळाला सुरुवात केली. घरातील वडील मंडळी सर्व कुस्तीगीर; परंतु मोनिकाने वेटलिफ्टिंग खेळातच करिअर घडविण्याचा निर्णय घेतला. मागीलवर्षी आसामला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिल्याने, महाराष्ट्र क्रीडा क्षेत्राचं तिच्याकडे लक्ष वेधल्या गेले. राष्ट्रीय स्पर्धेत तिनं ५३ स्नॅच आणि ६५ क्लिन ॲन्ड जर्क केले. प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते.
फोटोकॅप्शन: मुलांच्या गटात खेळप्रदर्शन करताना वेटलिफ्टर.-२१सीटीसीएल०८, २१सीटीसीएल०९
मोनिका कडनोर-२१सीटीसीएल४१