शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

डेरवणमध्ये क्रीडा महोत्सव : मुंबईची टेबल टेनिसपटू भूमी पितळेला सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 5:51 PM

मुंबईची १४ वर्षाखालील टेबल टेनिसपटू भूमी पितळेने बाजी मारली

डेरवण : कोकणातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने होणारा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव संस्थेच्या क्रीडासंकुलात जोरात सुरु झाला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही खो खो, कबड्डी, फुटबॉल, लंगडी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, नेमबाजी, अॅथलेटीक्स, वॉल क्लायम्बिंग, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिनटन अशा विविध खेळांच्या स्पर्धा रंगत आहेत. राज्यभरातील विविध शाळा, कॉलेज, क्लब, संघटना यामधील ४ हजाराहून अधिक खेळाडू यात सहभागी झाले आहेत. विजेत्या खेळाडूंना एकूण १२ लाखांची पारितोषिके दिली जात आहेत. मुंबईची १४ वर्षाखालील टेबल टेनिसपटू भूमी पितळेने अनुष्का जिरांगेचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.

राज्यातून तसेच थेट गुजरातमधूनही संघ या महोत्सवामध्ये हजेरी लावत आहेत. क्रीडा स्पर्धांबरोबरच येथील क्रीडा प्रेरणा व्यासपीठावर, दररोज एक याप्रमाणे क्रीडा विषयातील अनेक तज्ञांची व्याख्यानेही आयोजित करण्यात आली आहेत. सोमवारी झालेल्या व्याख्यानात स्क्वाड्रन लीडर संजय देशमुख यांनी तरुण खेळाडूंना, संरक्षण दलात उपलब्ध असलेल्या करियर संधी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय हवाई दलामध्ये वापरात असलेली विविध विमाने, त्यांची वैशिष्ट्ये यांची माहितीही दिली. एव्हरेस्टवीर भगवान चावले यांनी खेळाडूंशी संवाद साधला.  

येत्या २० मार्चला आहारतज्ञ स्वाती भोसकी खेळाडूंच्या आहाराबाबत माहिती देणार आहेत. २१ मार्चला आंतरराष्ट्रीय टेनिसपटू, डॉ. नताशा कानविंदे डोपिंगबाबत खेळाडूंशी संवाद साधतील. तर २२ मार्चला नेतृत्व कौशल्य या विषयावर शर्मिला कानविंदे मार्गदर्शन करतील.

स्पर्धेचे निकालटेबल टेनिस १४ वर्षांखालील मुले – यश पाटील (सुवर्ण), देव पाखरे (रौप्य)मुली – भूमी पितळे (सुवर्ण), अनुष्का जिरंगे (रौप्य)१६ वर्षांखालील मुले – अद्वैत बोंद्रे सुवर्ण), भव्य शाह (रौप्य)बॅडमिंनटन १४ वर्षांखालील मुले – तेजस शिंदे (सुवर्ण), ओमकार भंडारी (रौप्य),मुली – परिणीता मगदूम (सुवर्ण), देवांगी जाधव (रौप्य)१६ वर्षांखालील मुले – वर्धन डोंगरे (सुवर्ण), वेदांत देसाई (रौप्य)१८ वर्षांखालील मुले – अनुरूप भगत(सुवर्ण), अथर्व लाटे (रौप्य)

कबड्डी १४ वर्षांखालील मुली – विजेता संघ – गगनभरारी स्पोर्ट्स, कोल्हापूरउपविजेता संघ – निलेश्वर स्पोर्ट्स, कऱ्हाडउत्कृष्ट चढाई – धनश्री तेली, गगनभरारी स्पोर्ट्सउत्कृष्ट पकड – साक्षी पवार, निलेश्वर स्पोर्ट्स

१४ वर्षांखालील मुले – विजेता संघ एके ग्रुप, रायगडउपविजेता संघ, संस्कारधाम विद्यालय, महाडउत्कृष्ट पकड – विशाल यादव, संस्कारधाम, महाडउत्कृष्ट चढाई – कोशल बारटक्के, एम के, ग्रुप

१८ वर्षांखालील मुली – अंतिम विजयी – वेताळ बाबा कला क्रीडा, कोकरूडउपविजेता संघ – राजश्री शाहू विद्यानिकेतन, शिंगणापूरतृतीय संघ – सोहन स्टार स्पोर्ट्स, चिपळूणउत्कृष्ट चढाई – प्रीती शिंदे, वेताळबाबाउत्कृष्ट पकड – नेहा कुंभार, राजश्री शाहू विद्यानिकेतन

१८ वर्षांखालील मुले – अंतिम विजयी – न्यू हिंद विजय, चिपळूणउपविजेते – युवराज स्पोर्ट्स, देवरुखउत्कृष्ट चढाई – प्रसाद धामणे, युवराज स्पोर्ट्स, देवरुखउत्कृष्ट पकड – भूषण मुठेकर, न्यू हिंद विजय 

टॅग्स :Table Tennisटेबल टेनिसKabaddiकबड्डीRatnagiriरत्नागिरी