नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने स्कूल स्पोर्टस् प्रमोशन फाऊंडेशनला (एसएसपीएफ) मान्यता दिली आहे. पहिल्या वर्षी केलेल्या शानदार प्रदर्शनामुळे खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय खेळ संवर्धन संघटनेच्या रुपात सरकाने ही मान्यता दिली आहे. एसएसपीएफचे चेअरमन ओम पाठक यांनी आज ही माहिती दिली. ‘‘ ते म्हणाले ही अशी पहिली स्वतंत्र संस्था आहे. ज्याला सरकारने मान्यता दिली आहे. आम्ही मागच्या वर्षात क्रिकेट आणि फुटबॉलने सुरूवात केली होती. मात्र आता मान्यता मिळाल्याने मोठ्या ताकतीने आम्ही पुढे जाऊ. या वर्षी फुटबॉल आणि क्रिकेट सोबतच अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल या खेळांना मान्यता दिली जाईल. ’’पाठक यांनी सांगितले की,‘‘ गेल्या वर्षी २ ० राज्यातील १२०० शाळांच्या संघांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. यावर्षी २५ राज्यात ३०० जिल्ह्यात १० हजार शाळांच्या संघांना सहभागी करून घेण्याचे फाउंडेशनचे लक्ष्य आहे.’’ते पुढे म्हणाले,‘‘ या वर्षी जवळपास दोन लाख शाळकरी खेळाडू यात सहभागी होतील आणि सुमारे १६ हजार सामने खेळवले जातील. ’’ एसएसपीएफने विविध खेळांसाठी माजी खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चेअरमन म्हणून नियुक्त देखील केले आहे. चेतन शर्मा (क्रिकेट), बायचूंग भूतिया (फुटबॉल), जी.एस.रंधावा (अॅथलेटिक्स), ओमप्रकाश (व्हॉलिबॉल), हनुमान सिंह - (बास्केटबॉल) यांचा यात समावेश आहे.
क्रीडा मंत्रालयाची एसएसपीएफला मान्यता
By admin | Published: January 08, 2017 3:57 AM