नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेत सादर केलेल्या २०१६-१७च्या अर्थसंकल्पात क्रीडाक्षेत्रासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ५० कोटी ८७ लाख रुपयांची वाढ करण्यात आली.जेटली यांनी अर्थसंकल्पात क्रीडा मंत्रालयासाठी एकूण ,१५९२ कोटी रुपयांची तरतूद केली. गेल्या वर्षी १,५४१ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. राष्ट्रीय शिबिरांच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारतीय क्रीडा प्राधिकरणासाठी ११.९१ कोटी रुपयांची वाढ करताना यंदा ३८१.३० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. क्रीडा संस्थांना सहकार्य करण्यासाठी ५४५.९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यूथ व एनएसएस योजनेअंतर्गत २१५.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डोपिंगविरोधी योजनेसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. क्रीडाजगताला काय मिळाले?गतवर्षीच्या तरतुदीपेक्षा क्रीडा विभागासाठी जवळपास ६० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तुलनेने निधीतील वाढ अत्यल्प असली तरी अभिनंदनीय आहे. कारण क्रीडा क्षेत्राला यापूर्वी दुय्यम वागणूक दिली जात होती. केंद्र शासनाकडून राज्य सरकारकडे निधी येताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कितपत होते हे पुढील काळात पाहावे लागेल. - शिवाजी सरोदेआदिल सुमारीवाला क्रीडा क्षेत्रासाठी जी काही वाढीव तरतूद केली आहे, ती आनंदाची बाब आहे. आर्थिक मदतीमध्ये होणारी वाढ कधीही चांगलीच; मग ती कितीही असो. याचा भारतीय क्रीडा क्षेत्राला फायदा होईल. शिवाय डोपिंगविरोधी कारवाईसाठी केलेली १२ करोडची तरतूद महत्त्वाची ठरेल. बाळासाहेब लांडगे कुस्तीसह विविध खेळांत क्रीडापटू अव्वल कामगिरी करीत आहेत. खेळाडूंच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, याकरिता पुरेशा प्रशिक्षकांची नेमणूक करणे, गरजेनुसार परदेशी पशिक्षक नेमण्याबरोबरच खेळाडूलाही परदेशी प्रशिक्षणाची सुविधा देणे गरजेचे आहे. प्रल्हाद सावंतरियो आॅलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात क्रीडा विभागासाठी झुकते माप देणे गरजेचे होते. मात्र, यंदा १,५९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यात ५०.८७ कोटींची अत्यल्प वाढ करण्यात आली आहे. प्रल्हाद सावंतरियो आॅलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात क्रीडा विभागासाठी झुकते माप देणे गरजेचे होते. मात्र, यंदा १,५९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यात ५०.८७ कोटींची अत्यल्प वाढ करण्यात आली आहे. क्रीडा विभागासाठी प्रतिवर्षी वाढीव निधीची तरतूद केली पाहिजे. सध्या निधी मिळविण्यासाठी सरकारकडे भांडावे लागते. हॉकीची लोकप्रियता देशात वाढत आहे. रियो आॅलिम्पिकमध्ये अनेक वर्षांनंतर महिला व पुरुष संघ सहभागी होत आहेत. काही राज्यात अजूनही टर्फदेखील उपलब्ध नाहीत. - मनोज भोरे
क्रीडाक्षेत्राला केवळ ५० कोटींची वाढ
By admin | Published: March 01, 2016 3:07 AM