शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, मालिकाही जिंकली

By admin | Published: February 19, 2017 6:41 PM

श्रीलंकेनं अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियावर मात करत टी-20 मालिकेत विजय मिळवला आहे.

ऑनलाइन लोकमतगीलाँग, दि. 19 - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या दुस-या ट्वेंटी-20 लढतीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर दोन गडी राखून मात केली. एसेला गुणरत्नेने नाबाद 84 धावांची खेळी करत एकवेळ पराभवाच्या छायेत असलेल्या श्रीलंकेला थरारक विजय मिळवून दिला. त्याबरोबरच तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.श्रीलंकेला शेवटच्या चार षटकांत 52 धावांची गरज असतानाच त्यांच्याकडे फक्त 3 बळी शिल्लक होते. गुणरत्नेनं 19व्या षटकात हेनरिकच्या गोलंदाजीवर तीन षटकार आणि एक चौकार लगावत 22 धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या षटकांत श्रीलंकेला विजयासाठी 14 धावांची गरज होती. गुणरत्नेनं लसिथ मलिंगाच्या जोडीनं उत्कृष्ट खेळीचा नजराणा पेश करत हा विजय साजरा केला आहे. श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियासोबत लागोपाठ टी-20तली ही तिसरी मालिका खिशात घातली आहे. श्रीलंकेनं फलंदाजी करताना 40 धावांवर 5 बळी गमावले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर सुरुवातीला श्रीलंकेच्या फलंदाजांचा निभाव लागत नव्हता. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांना शेवटच्या षटकांत सूर गवसल्यानं त्यांनी हा विजय खेचून आणला.