शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

आश्विनच्या फिरकीपुढे श्रीलंका चीत

By admin | Published: August 25, 2015 4:24 AM

रविचंद्रन आश्विनच्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात २७८ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

कोलंबो : रविचंद्रन आश्विनच्या भेदक फिरकी माऱ्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात २७८ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताने महान फलंदाज कुमार संगकाराला विजयाने निरोप देण्याच्या श्रीलंका संघाचे स्वप्न धुळीस मिळवले. भारताने विजयासाठी दिलेल्या ४१३ धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा दुसरा डाव पाचव्या व अखेरच्या दिवशी उपाहारानंतर ४३.४ षटकांत १३४ धावांत संपुष्टात आला. आश्विनने ४२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिला कसोटी विजय ठरला. भारताने सुरुवातीपासून या लढतीत वर्चस्व कायम राखले. गॉलमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात पत्कराव्या लागलेल्या नाट्यमय पराभवादरम्यान झालेल्या चुकांपासून बोध घेत भारताने या लढतीत चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या बाजूचा विचार करताना संगकाराच्या चमकदार कारकिर्दीचा हा निराशाजनक शेवट ठरला. त्याला अखेरच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. श्रीलंका संघाने अखेरच्या ७ विकेट ५८ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. त्याआधी, पावसाच्या व्यत्ययामुळे निर्धारित वेळेपूर्वीच उपाहारासाठी खेळ थांबविण्यात आला. लेगस्पिनर अमित मिश्राने दुष्मंता चामिराला (४) बाद करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने उपाहारानंतर पाचव्या चेंडूवर विजय निश्चित केला. आश्विन व्यतिरिक्त मिश्राने २९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व उमेश यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. यजमान संघातर्फे दिमुथ करुणारत्नेने १०३ चेंडूंना सामोरे जाताना ४६ धावांची खेळी केली. करुणारत्नेचा अपवाद वगळता आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. उभय संघांदरम्यान तिसरा व निर्णायक कसोटी सामना २८ आॅगस्टपासून खेळला जाणार आहे.श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. आज पहिल्याच चेंडूवर कर्णधार अँजेलो मॅथ्यूज बाद झाला. कालच्या २ बाद ७२ धावसंख्येवरून पुढे खेळताना श्रीलंकेने २२व्या षटकात कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची विकेट गमावली. उमेश यादवच्या गोलंदाजीवर तो बदली यष्टिरक्षक राहुलकडे झेल देऊन माघारी परतला. मिश्राने २८व्या षटकात दिनेश चांदीमलला (१५) तंबूचा मार्ग दाखविला. श्रीलंकेने ३०व्या षटकात शंभर धावांचा पल्ला गाठला. पहिल्या तासाभराच्या खेळानंतर श्रीलंकेची ४ बाद १०६ अशी अवस्था होती. आश्विनने सहाव्या चेंडूवर लाहिरू थिरीमानेला (११) बाद केले. त्यानंतरच्या षटकात ईशांतने जेहान मुबारकला (०) खाते उघडण्यापूर्वीच दुसऱ्या स्लिपमध्ये कर्णधार कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. आश्विनने ३७व्या षटकात धम्मिका प्रसादला (०) आणि त्यानंतर दोन षटकांनी करुणारत्नेला तंबूचा मार्ग दाखवून डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. उपाहाराला १४ मिनिटांचा अवधी शिल्लक असताना मिश्राने थारिंडू कौशलला (५) पायचित केले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्यामुळे पंचांनी उपाहारासाठी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. उपाहारानंतर मिश्राने चामिराला बाद करून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. (वृत्तसंस्था)धावफलकभारत पहिला डाव ३९३. श्रीलंका पहिला डाव ३०६. भारत दुसरा डाव ८ बाद ३२५ (डाव घोषित).श्रीलंका दुसरा डाव : कौशल सिल्वा झे. बिन्नी गो. आश्विन ०१, दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. आश्विन ४६, कुमार संगकारा झे. विजय गो. आश्विन १८, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज झे. राहुल गो. यादव २३, दिनेश चांदीमल त्रि. गो. मिश्रा १५, लाहिरू थिरिमाने झे. पुजारा गो. आश्विन ११, जेहान मुबारक झे. कोहली गो. ईशांत ००, धम्मिका प्रसाद झे. मिश्रा गो. आश्विन ००, रंगाना हेराथ नाबाद ०४, थारिंडू कौशल पायचीत गो. मिश्रा ०५, दुष्मंता चामीरा पायचीत गो. मिश्रा ०४. अवांतर (७). एकूण ४३.४ षटकांत सर्व बाद १३४. बाद क्रम : १-८, २-३३, ३-७२, ४-९१, ५-१०६, ६-१११, ७-११४, ८-१२३, ९-१२८, १०-१३४. गोलंदाजी : आश्विन १६-६-४२-५, यादव ७-१-१८-१, ईशांत ११-२-४१-१, मिश्रा ९.४-३-२९-३.