शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

श्रीलंकेचा यूएईवर विजय

By admin | Published: February 26, 2016 4:04 AM

दिनेश चंडीमलचे अर्धशतक, लसिथ मलिंगा (४ बळी) व नुवान कुलशेखराच्या (३ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने यूएईला १४ धावांनी पराभूत केले. स्वप्निल पाटीलने

मिरपूर : दिनेश चंडीमलचे अर्धशतक, लसिथ मलिंगा (४ बळी) व नुवान कुलशेखराच्या (३ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने यूएईला १४ धावांनी पराभूत केले. स्वप्निल पाटीलने ३७ धावा टोलावत दिलेली एकाकी झुंज यूएईला विजय मिळवून देण्यात अपुरी ठरली. मिरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर अशियाई चषक टी-टष्ट्वेन्टी स्पर्धेचा सामना झाला. युएईने प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला १२९ धावांत रोखले. त्यानंतर विजयासाठी १३० धावांचा पाठलाग करताना युएईचा डाव २० षटकांत ९ बाद ११५ धावांत आटोपला. मलिंगाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर रोहन मुस्तफा पायचीत झाला. त्यानंतर मोहम्मद शहझाद (१) , मोहम्मद कलीम (७), मुहम्मद उस्मान (६), शइम अन्वर (१३), सकलेन हैदर (१) किरकोळीत बाद झाले. त्यामुळे युएईची अवस्था ६ बाद ४७ अशी बिकट झाली. स्वप्निल पाटीलने ३६ चेंडूत ३ चौकार व २ षटकाराच्या सहाय्याने ३७ धावा टोलावत सामन्यात रंगत आणली. संक्षिप्त धावफलक श्रीलंका : २० षटकांत ८ बाद १२९ (दिनेश चंडीमल ५०, तिलकरत्ने दिलशान २७, शेहन जयसूर्या १०, नुवान कुलशेखरा १०, मोहंमद नावेद २/२७, अमजद जावेद ३/२५, मोहंमद शहजाद २/२७, रोहन मुस्तफा १/१७).यूएई : २० षटकांत ९ बाद ११५ (स्वप्निल पाटील ३७, शइम अन्वर १३, अमजद जावेद १३, मोहंमद नावेद १०, लसिथ मलिंगा ४/२६, नुवान कुलशेखरा ३/१०, रंगना हेराथ २/२२).