शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

श्रीलंकेला विजयी सलामीची संधी

By admin | Published: March 17, 2016 1:27 AM

दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर नव्याने क्रिकेट वाटचालीस सुरुवात करणारा श्रीलंका गुरुवारी टी-२० विश्वचषकची सुरुवात उदयोन्मुख अफगाणिस्तानविरुद्ध करेल. अफगाणिस्तानकडे

कोलकाता : दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर नव्याने क्रिकेट वाटचालीस सुरुवात करणारा श्रीलंका गुरुवारी टी-२० विश्वचषकची सुरुवात उदयोन्मुख अफगाणिस्तानविरुद्ध करेल. अफगाणिस्तानकडे अनपेक्षित निकाल नोंदविण्याची क्षमता असल्याची जाणीव असल्याने लंकेला पहिल्याच लढतीत सांभाळून खेळावे लागेल.इडनगार्डन येथे होणारा हा सामना श्रीलंकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिजसारखे बलाढ्य संघ असताना अफगाणिस्तानला नमवून विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न लंकेचा असेल. गतविजेता श्रीलंका आतापर्यंत टी-२० विश्वचषकमधील यशस्वी संघ ठरला आहे. गतवर्षी बाजी मारलेल्या लंकेने २००९ व २०१२ मध्ये उपविजेतेपद पटकावले. गतस्पर्धेत लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली भारताला नमवून जगज्जेता झालेल्या श्रीलंकेला त्यानंतर १४ सामन्यांपैकी केवळ ४ सामने जिंकता आले आहेत. गुडघ्याच्या दुखापतीमुळे कर्णधारपद सोडलेल्या मलिंगाच्या खेळण्याविषयी निश्चिती नसल्याने लंकेसमोर मोठे आव्हान असेल. अशा परिस्थितीत कर्णधार मॅथ्यूजपुढे अडचणीचा मार्ग असेल. तरीही, आयसीसीच्या स्पर्धांचा मागोवा घेतल्यास श्रीलंकेने कायम चांगली कामगिरी केल्याचे लक्षात येईल. त्यामुळे त्यांचा अफगाणिस्तानविरुद्ध तरी विजय गृहीत धरला जात आहे. फिरकीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर श्रीलंकेचा मारा रंगाना हेराथवर अवलंबून असेल. फलंदाजांकडून त्यांना मोठ्या अपेक्षा असून तिलकरत्ने दिलशानचा हरवलेला फॉर्म लंकेच्या चिंतेचा विषय आहे. मात्र अफगाणिस्तानविरुद्ध तो दणक्यात पुनरागमन करू शकतो. तसेच दिनेश चंडीमल, लाहिरू थिरीमाने, अष्टपैलू थिसारा परेरा या खेळाडूंवरही लंकेची भिस्त आहे. संघ यातून निवडणार श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), तिलकरत्ने दिलशान, स्नेहन जयसूर्या, सचित्रा सेनानायके, दिनेश चंडीमल, मिलिंदा सिरीवर्धना,चमारा कापुगेदरा, थिसारा परेरा, निरोशन डिकवेला, रंगाना हेराथ, नुवान कुलसेकरा, लसिथ मलिंगा, दुष्मंता चामीरा, दसुना शनाका आणि जाफरी वेंडेरसे.अफगाणिस्तान : असगर स्टानिकजाइ (कर्णधार), मोहम्मद शहजाद, नूरअली जदरान, उस्मान गनी, मोहम्मद नबी, करीम सादिक, शफीकुल्लाह शफीक, रशीद खान, अमीर हमजा, दौलत जदरान, शापूर जदरान, गुलबदन नाइब, समीउल्लाह शेनवारी, नजीबुल्लाह जदरान आणि हामिद हसन. हेड टू हेडश्रीलंका व अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये अजूनपर्यंत एकही टी-२०चा सामना झालेला नाही. श्रीलंकेने एकूण ८० तर अफगाणिस्तानने ४४ सामने खेळले आहेत. सामन्याची वेळसायंकाळी ७. ३०स्थळ : ईडन गार्डन, कोलकाता