झिम्बाब्वेविरुद्ध श्रीलंकेच्या ५३७ धावा
By admin | Published: October 30, 2016 10:47 PM
पहिली कसोटी : परेरा, थरंगा यांची शतके
पहिली कसोटी : परेरा, थरंगा यांची शतकेहरारे : कुशल परेरा आणि उपूल थरंगा यांच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या डावात ५३७ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने बिनबाद १९ धावा केल्या.श्रीलंकेतर्फे कुशल परेरा याने १२१ चेंडूंत १५ चौकार व २ षटकारांसह ११० धावांची खेळी सजवली. विशेष म्हणजे परेरा याला १५ व ३० धावांवर जीवदान मिळाले होते. अनुभवी उपूल थरंगा याने २०८ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ११० धावांची शानदार खेळी केली. शतकापासून ६ धावांनी वंचित राहिलेल्या कुशल सिल्व्हा याने १९४ चेंडूंत ११ चौकारांसह ९४, दिमुथ करुणारत्ने याने ५६ आणि गुणरत्ने याने ५४ धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून क्रेमरने १४२ धावांत ४, तर मोफूने ९६ धावांत २ गडी बाद केले.दिमुथ करुणारत्ने आणि कुशल सिल्व्हा यांनी पहिल्या गड्यासाठी ३७.३ षटकांत १२३ धावांची भागीदारी करीत चांगली सुरुवात करून देत मोठ्या धावसंख्येची मजबूत पायाभरणी केली. त्यानंतर कुशल सिल्व्हाने परेरा याच्या साथीने दुसर्या गड्यासाठी ७५ धावांची भागीदारी करीत श्रीलंकेच्या धावसंख्येला आकार दिला. कुशल सिल्व्हा परतल्यानंतर परेराने के. मेंडिसच्या साथीने तिसर्या गड्यासाठी ८४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मेंडिस आणि परेरा तंबूत परतल्यानंतर अनुभवी उपूल थरंगाने ए. गुणरत्नेच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ९९ धावांची श्रीलंकेच्या धावसंख्येत भर टाकली.संक्षिप्त धावफलकश्रीलंका (पहिला डाव) ५३७.(उपूल थरंगा नाबाद ११०, कुशल परेरा ११०, दिमुथ करुणारत्ने ५६, गुणरत्ने ५४. क्रेमर ४/१४२, मोफू २/९६).झिम्बाब्वे : पहिला डाव : बिनबाद १९.