शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

श्रीलंकेपुढे ४०५ धावांचे लक्ष्य

By admin | Published: December 13, 2015 11:21 PM

सलामीवीर टॉम लॅथमची (नाबाद १०९) शतकी खेळी आणि केन विल्यम्सनसोबत (७१) दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १४१ धावांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध

ड्युनेडिन : सलामीवीर टॉम लॅथमची (नाबाद १०९) शतकी खेळी आणि केन विल्यम्सनसोबत (७१) दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १४१ धावांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा डाव चौथ्या दिवशी ३ बाद २६७ धावसंख्येवर घोषित केला आणि पाहुण्या संघापुढे विजयासाठी ४०५ धावांचे लक्ष्य ठेवले. १ बाद १७१ धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाचा दुसरा डाव कर्णधार ब्रॅन्डन मॅक्युलमने ६५.४ षटकांनंतर ३ बाद २६७ धावसंख्येवर घोषित केला. श्रीलंका संघाने दिवसअखेर ५०.१ षटकांत ३ बाद १०९ धावांची मजल मारली होती. श्रीलंका संघाला विजयासाठी अद्याप २९६ धावांची गरज असून, त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत. लॅथमने १८० चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार ठोकले. विल्यम्सनने ११५ चेंडूंमध्ये ७ चौकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या. विल्यम्सनला दुष्मांता चमीराने माघारी परतवले. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या रॉस टेलरला (१५) मोठी खेळी करता आली नाही. रंगाना हेराथने त्याला क्लीन बोल्ड करीत माघारी धाडले. कर्णधार मॅक्युलमने आक्रमक फलंदाजी करीत ६ चेंडूंमध्ये २ षटकारांच्या मदतीने नाबाद १७ धावा फटकावल्या. त्यानंतर मॅक्युलमने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. रंगाना हेराथने ११.४ षटकांत ६२ धावांच्या मोबदल्यात २, तर चमीराने १४ षटकांत ६१ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला. ४०५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघाची सुरुवात विशेष चांगली झाली नाही. त्यांची ३२.३ षटकांत २ बाद ६४ अशी अवस्था झाली होती. सलामीवीर दिमुथ करुणारत्नेने संथ फलंदाजी करताना ७२ चेंडूंमध्ये केवळ १ चौकार मारताना २९ धावा फटकावल्या. त्याला टीम साऊदीने माघारी परतवले. पदार्पणाची कसोटी खेळणारा उदारा जयसुंदराने १५ चेंडूंमध्ये केवळ ३ धावा केल्या. त्याला नील वाग्नरने बाद केले. त्यानंतर कुशल मेंडिस व दिनेश चंडीमल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. मेंडिस (४६) साऊदीचा दुसरा बळी ठरला. त्याने १५० चेंडूंमध्ये ५ चौकार ठोकले. चंडीमलने ६४ चेंडूंमध्ये ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक न्युझिलंड : पहिला डाव सर्वबाद ४३१; श्रीलंका : पहिला डाव सर्वबाद २९४न्युझिलंड ; दुसरा डाव २६७/३ घोषीत : टॉम लॅथम १०९, मार्टिन गुप्तील ४६, केन विल्यमसन ७१, गोलंदाजी : रंगना हेराथ २/६२, दुश्मंथा चमिरा १ /६१ श्रीलंका दुसरा डाव १०९/३; दिमुथ करुणारत्ने २९, कौशल मेन्डीस ४६,दिनेश चंडिमल ३१ नाबाद; गोलंदाजी : टीम साऊथी २/१६, नील वॅग्नर १/२८.