श्रीकांत, कश्यपची विजयी सलामी जर्मन बॅडमिंटन : आर्टेम, पोचतारेव, ताकुमा यूएदा पराभूत
By admin | Published: March 03, 2016 1:57 AM
मुल्हेम एन डेर रूर (जर्मनी) : भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप यांनी जर्मन ग्रां. प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देताना दुसर्या फेरीत प्रवेश केला. सहाव्या मानांकित श्रीकांतला विजयासाठी जपानच्या ताकुमा यूएदाकडून कडवी झुंज मिळाली, तर ११व्या मानांकित कश्यपने तुफानी खेळ करताना युक्रेनच्या आर्टेम पोचतारेवचा अवघ्या २४ मिनिटांमध्ये धुव्वा उडवला.
मुल्हेम एन डेर रूर (जर्मनी) : भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप यांनी जर्मन ग्रां. प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी देताना दुसर्या फेरीत प्रवेश केला. सहाव्या मानांकित श्रीकांतला विजयासाठी जपानच्या ताकुमा यूएदाकडून कडवी झुंज मिळाली, तर ११व्या मानांकित कश्यपने तुफानी खेळ करताना युक्रेनच्या आर्टेम पोचतारेवचा अवघ्या २४ मिनिटांमध्ये धुव्वा उडवला.मंगळवारी झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये श्रीकांतला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. तीन सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात यूएदाने पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होती. यावेळी श्रीकांत काहीसा दडपणाखाली दिसला. मात्र, दुसर्या सेटच्या सुरुवातीला आघाडी मिळवल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या श्रीकांतने सलग दोन सेटमध्ये बाजी मारून १२-२१, २१-१८, २१-११ असा झुंजार विजय मिळवला. त्याचवेळी यानंतर झालेल्या अत्यंत एकतर्फी सामन्यात अनुभवी कश्यपने तुफानी आक्रमक खेळ करताना पोचतारेवला प्रतिकाराची एकही संधी दिली नाही. केवळ २४ मिनिटांमध्ये विजय मिळवताना कश्यपने २१-९, २१-९ अशी वेगवान बाजी मारत पोचतारेवचा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, यानंतर भारताच्या समीर वर्मानेदेखील अवघ्या २४ मिनिटांमध्ये वेगवान विजय मिळवताना युक्रेनच्या दिमित्रो जावादस्कीचा २१-९, २१-८ असा फडशा पाडून विजयी कूच केली. पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत जागा मिळवलेल्या कौशल धर्मामेरला मात्र जर्मनीच्या मार्क ज्वेबलर विरुद्ध ३० मिनिटांमध्येच ४-२१, १४-२१ असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था).........................................जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने यूएदा विरुद्धच्या विजयाने शानदार पुनरागमन करताना झुंजार खेळाची झलक देत त्याने यूएदाविरुद्धचा करियर रेकॉर्ड ४-१ असा केला. पुढील फेरीत श्रीकांतसमोर हॉलंडच्या एरिक मेजसचे कडवे आव्हान असेल. दोघेही पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने या सामन्याकडे विशेष लक्ष असेल. .......................................अनुभवी पी. कश्यपनेदेखील पहिल्याच सामन्यात आक्रमक खेळ करताना सर्वांचे लक्ष वेधले. दुसर्या फेरीत कश्यपपुढे आयर्लंडच्या जोशुआ मैगीचे आव्हान असून, हे दोन्ही खेळाडूही पहिल्यांदाच एकमेकांसमोर खेळतील, तर समीर वर्माची पुढील लढत कोरियाच्या ली डोंग क्यून विरुद्ध होईल..........................................