मेलबर्न : पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसमध्ये मार्गारेट कोर्टच्या २४ एकेरी ग्रँडस्लॅम विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी सेरेना विलियम्सकडे असेल. आॅस्ट्रेलियाची खेळाडू राहिलेल्या कोर्टने २४ ग्रँडस्लॅमपैकी १३ जेतेपद १९६८ आधीच जिंकले होते. महिला टेनिस ओपन युगाची सुरुवात त्यानंतर झाली. सध्या ७६ वर्षांची असलेल्या कोर्टने १९६० ते १०७३ पर्यंत एकेरीचे २४ विजेतेपद पटकविले. त्यात ११ ऑस्ट्रेलियन ओपन, तीनवेळा फ्रेंच ओपन, सात विम्बल्डन आणि पाच अमेरिकन ओपन जेतेपदाचा समावेश आहे.
सेरेनाने १९९८ पासून आतापर्यंत २३ एकेरी ग्रँडस्लॅम जिंकले. त्यात सात आॅस्ट्रेलियन ओपन, तीन फ्रेंच ओपन, सात विम्बल्डन आणि सहा अमेरिकन ओपन जेतेपदाचा समावेश आहे. कारकिर्दीत १८ ग्रँडस्लॅम जिंंकणारी ख्रिस एव्हर्ट हिच्यामते सध्याच्या खेळाचा दर्जा आधीच्या तुलनेत फारच उत्कृष्ट असल्याने तुलनाच होऊ शकत नाही. एव्हर्ट म्हणाली, ‘सेरेना सर्वोत्कृष्ट आहे यात शंका नाही. आम्ही आपल्यावेळी सर्वोत्कृष्ट होतो आणि सेरेना सध्याच्या युगात सर्वोत्कृष्ट आहे. २०१७ च्या आॅस्ट्रेलियन ओपनपासून सेरेनाची नजर २४ व्या जेतेपदावर आहे. त्यावेळी आठ आठवड्यांची गर्भवती असलेल्या सेरेनाने जेतेपद पटकविले होते. विक्रमाविषयी फारशी चिंतेत नाहीसेरेना माझा विक्रम मोडेल किंवा बरोबरी साधेल याबाबत मी फारशी चिंतेत नाहीं, असे सांगून कोर्ट म्हणाली, ‘मी २४ एकेरी ग्रँडस्लॅमशिवाय ४० दुहेरीचे ग्रॅन्डस्लॅम जिंकले याचे मोठे समाधान आहे. माझ्यामते कुठलाही खेळाडू माझ्या ५४ ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी करू शकणार नाही. तथापि कुणी २४ पेक्षा अधिक एकेरीचे जेतेपद पटकवित असेल तर ती व्यक्ती निचितपणे हकदार होऊ शकेल.’रामकुमार, अंकिता विजयीमेलबर्न : भारतीय टेनिसपटू रामकुमार रामनाथन आणि अंकिता रैना यांनी आॅस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीत सरळ सेटमध्ये विजय नोंदविले पण करमन कौर थंडी पहिल्याच सामन्यात पराभूत होऊन बाहेर पडली. रामकुमारने पुरुष एकेरीत स्पेनचा सर्जियो गुइटिरेज याचा ६-३,६-२ ने पराभव केला. अंकिताने फ्रान्सची मार्टिले गार्जेस हिच्यावर ६-२,६-२ ने विजय साजरा केला. त्याचवेळी पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झालेली करमन थंडी जेनिफर ब्राडीकडून ०-६, ५-७ ने पराभूत झाली. प्रज्नेश गुणेश्वरन आज बुधवारी क्रोएशियाचा व्हिक्टर गालोविच याच्याविरुद्ध पहिला सामना खेळेल.