शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

किणी येथे हिम्मतबहाद्दूर पथक कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

By admin | Published: November 22, 2014 11:30 PM

किणी : किणी (ता. हातकणंगले) येथील किणी विद्यार्थी मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या ६०व्या क्रीडा महोत्सवांतर्गत हिम्मतबहाद्दूर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धेचा प्रारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

किणी : किणी (ता. हातकणंगले) येथील किणी विद्यार्थी मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या ६०व्या क्रीडा महोत्सवांतर्गत हिम्मतबहाद्दूर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धेचा प्रारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
किणी विद्यार्थी मंडळाच्यावतीने व जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने हिम्मतबहाद्दूर चषक कबड्डी स्पर्धेत ७०हून अधिक संघांनी सहभाग नोंदविला. दिवस-रात्र प्रकाशझोतात सामने खेळविले जाणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन महेंद्रसिंह चव्हाण (हिम्मतबहाद्दूर) यांच्या हस्ते व क्रीडांगणाचे पूजन विजयसिंह चव्हाण (हिम्मतबहाद्दूर) यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती शशिकला पाटील होत्या. यावेळी वारणा बझारचे संचालक अनिल पाटील, किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुहास माने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या सामन्यात हिंदकेसरी (कवठेपिरान) साधना क्रीडा मंडळ (म्हालसवडे), कर्मवीर स्पोर्ट (कामेरी), प्रिन्स स्पोर्ट (लाटवडे), बळवंतराव यादव हायस्कूल (पेठवडगाव), किणी विद्यार्थी मंडळ (किणी), स्वराज्य स्पोर्ट (शिरोली), शिवगर्जना (कासेगाव), साधना क्रीडा मंडळ (कुरुंदवाड) या संघांनी उपउपांत्यफेरीत प्रवेश केला.
या स्पर्धा राज्य पंच मंडळाचे सदस्य अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एस. निकम, अर्जुन खांडेकर, रावसाहेब पाटील, कुबेर पाटील, अभिजित पाटणे, सुनील चौगुले, सुरेश खराडे, आदी पंच सामनाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
-----------
फोटो मेल
फोटेा ओळ :
किणी येथील सामन्याचा एक क्षण