ग्लास्गो : स्टार खेळाडू सायना नेहवालने अखेरच्या क्षणी माघार घेतल्यानंतरही भारतीय बॅडमिंटन पथक 2क् व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी कायम राखण्याच्या इराद्याने उतरणार आहे. या खेळात भारताची सुरुवात उद्या गुरुवारी घानाविरुद्ध मिश्र सांघिक प्रकारातील सामन्याद्वारे होईल.
भारताने नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले होते. सुवर्ण जिंकण्याचा मान मिळविणा:या सायनाला यंदा दुखापतीमुळे माघार पत्करावी लागली पण मागच्या स्पर्धेतील पदक कायम राहतील इतकी सरस कामगिरी करण्यासाठी इतर भारतीय खेळाडू सज्ज आहेत.
सायनाच्या अनुपस्थितीचे कारण विसरुन पदक कसे जिंकायचे याचा विचार करण्याचे निर्देश सर्व खेळाडूंना देण्यात आले आहेत. संघ व्यवस्थापक तेजपालसिंग पुरी म्हणाले,‘ सर्व खेळाडू सामने जिंकण्यासाठी सज्ज असल्यामुळे आम्ही मागील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास इच्छूक आहोत.’
उद्या होणा:या घाना आणि केनियाविरुद्धच्या लढतीबद्दल ते म्हणाले,‘आम्ही गटात अव्वल स्थानासह उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या इराद्याने खेळू.’ सहा गटातील ग्रूपमधील अव्वल सहा संघ तसेच बेस्ट रनर्स अप दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील. ‘मागच्या स्पर्धेत भारताने मिश्र प्रकारात सुवर्ण जिंकले होते पण यंदा सुरुवातीच्या सामन्यानंतर बाद फेरीसाठी वेगळा ड्रॉ पडेल. कोण कोणाविरुद्ध खेळेल, हे त्यानंतरच निश्चित होईल, असे पुरी म्हणाले.
विश्व क्रमवारीत अव्वल
स्थानावर असलेला ली चोंग वेई याने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे भारताला किमान पुरुष एकेरीत एक पदक
निश्चित जिंकण्याची हमी वाटत आहे. (वृत्तसंस्था)
पदकाची आशा असलेले पी. कश्यप आणि पी. व्ही. सिंधू यांना एकेरीत तर ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना महिला दुहेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या कडव्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. सायनाच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघ दुबळा झाल्याचे मानले जात आहे. पण तरीही दुहेरी आणि मिश्र प्रकारात पदके जिंकण्याची संधी आहे. भारताला ब गटात स्थान मिळाले. या गटात घाना, केनिया आणि युगांडा हे संघ असल्याने पुढील फेरी गाठणो भारतासाठी कठीण जाणार नाही.
कॅ नडाविरूद्ध महिला हॉकी करणार अभियानाची सुरूवात
भारतीय महिला हॉकी संघाची पहिली लढत क गटात कॅनडाविरूद्ध उद्या होईल. उपांत्य फेरीर्पयत धडक मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय महिलांना न्यूङिालंड, त्रिनिदाद आणि टोबॅको व द. आफ्रिकेविरूद्ध लढावे लागणार आहे.