मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने 56 वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर हौशी खो-खो असोसिएशन, उत्कर्ष क्रीडा मंडळ व ह. दे. प्रशाला आयोजित ही स्पर्धा ह. दे. प्रशाला क्रीडांगण येथे 12 ते 15 डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई खो-खो संघटनेचा पुरुष व महिला संघ जाहीर करण्यात आला. श्रीकांत वल्लाकाठी व भक्ती धांगडे यांच्याकडे अनुक्रमे पुरुष व महिला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
पुरुष संघ: वेदांत देसाई, विराज कोठमकर, पीयूष घोलम (सर्व श्री समर्थ व्यायाम मंदिर), श्रीकांत वल्लाकाठी (कर्णधार), श्रेयस राऊळ, निखिल कांबळे (सर्व सरस्वती स्पो. क्लब), प्रयाग कनगुटकर, शुभम शिगवण, आशुतोष शिंदे (सर्व ओमसमर्थ भारत व्यायाम मंदिर), नीरव पाटील, अनिकेत आडारकर (अमरहिंद मंडळ), सुजय मोरे (विद्यार्थी), प्रक्षिशक: पांडुरंग परब (विजय क्लब), व्यवस्थापक : प्रफुल्ल पाटील (अमरहिंद मंडळ)
महिला संघ: भक्ती धांगडे (कर्णधार), साजल पाटील, अनुष्का प्रभू, प्राजक्ता ढोबळे (सर्व श्री समर्थ व्यायाम मंदिर), शिवानी परब, नम्रता यादव, काजल दिवेकर (सर्व सरस्वती कन्या संघ), अक्षया गावडे, दर्शना सकपाळ, शिवानी गुप्ता (शिवनेरी सेवा मंडळ) मधुरा पेडणेकर, संजना कुडव (अमरहिंद मंडळ) प्रक्षिशक: डलेश देसाई (सरस्वती स्पो. क्लब), व्यवस्थापिका : प्राची गवंडी (ओमसमर्थ भारत व्यायाम मंदिर)