सोलापूर - महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर येथे सुरू असलेल्या 56व्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई उपनगर वि. नाशिक, ठाणे वि. मुंबई, सांगली वि. पालघर व पुणे वि. सोलापूर तर महिलांमध्ये ठाणे वि. सांगली, सातारा वि. उस्मानाबाद, पुणे वि. औरंगाबाद व रत्नागिरी वि. नगर उपांत्यपूर्व फेरीत लढणार आहेत.
आज झालेल्या पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईने जळगाववर 19-09 असा एक डाव दहा गुणांनी विजय संपादन केला. या सामन्यात पियूष घोलमने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण केले व चार खेळाडू बाद केले. शुभम शिगवणने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण केले व तीन खेळाडू बाद केले. प्रयाग कानगुटकरने एक मिनिटे चाळीस सेकंद व दोन मिनिटे संरक्षण केले तसेच तीन खेळाडू बाद केले. व अनिकेत आडारकरने दोन मिनिटे संरक्षण केले व एक खेळाडू बाद केला. तर पराभूत जळगावच्या हर्षल बेडिस्करने तीन खेळाडू बाद केले व रोहण कुरकुरेने दोन खेळाडू बाद केले.
पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पुण्याने बीडचा 18-08 असा एक डाव दहा गुणांनी दणदणीत पराभव केला. पुण्याच्या सागर लेंगरेने दोन मिनिटे चाळीस सेकंद व दोन मिनिटे वीस सेकंद संरक्षण केले व दोन खेळाडू बाद केले, अक्षय गणपुलेने दोन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केले व तीन खेळाडू बाद केले व सुयश गरगटेने नाबाद दोन मिनिटे संरक्षण केले व तीन खेळाडू बाद केले. पराभूत बीडच्या गौरव जोगदंडने दोन खेळाडू बाद केले.
पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यजमान सोलापूराने उस्मानाबादचा 17-11 असा सहा गुणांनी विजय मिळवला. सोलापूरच्या रामजी कश्यपने दोन मिनिटे तीस सेकंद व तीन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण करून दोन खेळाडू बाद केले, प्रविण गोवेने दोन मिनिटे संरक्षण केले, अजरोद्दीन शेखने एक मिनिट पन्नास सेकंद संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले तर पराभूत उस्मानाबादच्या कृष्णा राठोडने एक मिनिटे तीस सेकंद व एक मिनिट संरक्षण केले व राजाभाऊ शिंदेने एक मिनिट व एक मिनिटे वीस सेकंद संरक्षण केले.
पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरने सातार्याचा 16-11 असा एक डाव पाच गुणांनी पराभव केला. या सामन्यात उपनगच्या ऋषिकेश मूर्चावडेने दोन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला. प्रतीक देवरेने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण केले व दोन खेळाडू बाद केले, हर्षद हातणकरने नाबाद दोन मिनिटे संरक्षण केले व तीन खेळाडू बाद केले तर पराभूत सातार्याच्या शुभम केंजलेने व श्रेयश पाटीलने प्रत्येकी एक मिनिट संरक्षण करून दोन-दोन खेळाडू बाद केले.
पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नाशिकाने नंदुरबारचा 12-06 असा एक डाव सहा गुणांनी पराभव केला. सांगलीने रायगडवर 18-10 असा एक डाव आठ गुणांनी विजय साजरा केला.
महिलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ठाण्याने जालन्याचा 25-05 असा एक डाव 21 गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात ठाण्याच्या रेशमा राठोडने तीन मिनिटे वीस सेकंद संरक्षण करून दोन खेळाडू बाद केले, अश्विनी मोरेने तीन मिनिटे वीस सेकंद संरक्षण केल, मीनल भोईरने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले व पाच खेळाडू बाद केले व पुजा फरगडेने सात खेळाडू बाद केले.
महिलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सांगलीने यजमान सोलापूरवर 16-14 तीन मिनिटे राखून दोन गुणांनी विजय साजरा केला. सांगलीच्या रितीका मागदुमने दोन मिनिटे दहा सेकंद व एक मिनिट तीस सेकंद संरक्षण केले तसेच दोन खेळाडू बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला. दोन मिनिटे वीस सेकंद संरक्षण केले, साक्षी पाटीलने दोन मिनिटे संरक्षण करून तीन खेळाडू बाद केले. तर प्राजक्ता पवारने चार खेळाडू बाद केले.
महिलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उस्मानाबादने बीडचा 24-02 असा एक डाव 22 गुणांनी पराभव केला. उस्मानाबादच्या निकिता पवारने तीन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण करून एक खेळाडू बाद केला. किरण शिंदेने तीन मिनिटे वीस सेकंद सेकंद संरक्षण केले. वैभवी गायकवडने सहा खेळाडू बाद केले, सारिका काळेने पाच खेळाडू बाद केले व ऋतुजा खरेने चार खेळाडू बाद केले.
इतर महिलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रत्नागिरीने धुळ्याचा 36-05 असा एक डाव 31 गुणांनी पराभव केला. अहमदनगरने नंदुरबारचा 18-03 असा एक डाव 15 गुणांनी पराभव केला. औरंगाबादाने मुंबईचा दोन मिनिटे राखून 15-13 असा दोन गुणांनी पराभव केला. पुण्याने नाशिकचा 09-07 असा एक डाव दोन गुणांनी पराभव केला. सातार्याने मुंबई उपनगराचा 07-06 असा साडे तीन मिनिटे राखून एक गुणांनी पराभव केला.