शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

राज्य टेबल टेनिस : मुंबई उपनगर संघाला दुहेरी मुकुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 2:23 AM

राज्य टेबल टेनिस : कॅ डेट मुली तसेच सब ज्युनिअर मुलांच्या गटातून यजमान पुणे संघ अंतिम फेरीत

पुणे : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेतर्फे (एमएसटीटीए) आयोजित ४९व्या आंतरजिल्हा आणि ८०व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी मुंबई उपनगर संघाने वर्चस्व गाजविताना महिला तसेच यूथ मुलींच्या गटात विजेतेपद पटकाविले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. सांघिक प्रकारातील महिला गटात झालेल्या अंतिम फेरीत मुंबई उपनगर संघाने मुंबई शहरचा ३-१ने पराभव केला. श्वेता परातेने ममत प्रभू हिला १२-१४, ११-८, ११-८, ११-८ने नमवून मुंबई शहर संघाला १-०ने आघाडी मिळवून दिली. मात्र, नंतरचे तिन्ही सामने जिंकत मुंबई उपनगरने बाजी मारली.

विधी शाह हिने सेनोरा डिसुझाला ११-७, ५-११, ११-९, १०-१२, ११-९ ने पराभूत केले. अनन्या बसक हिने मानसी चिपळूणकर हिच्यावर ६-११, ११-७, ११-९, ११-४ने मात केली. ममता प्रभू हिने सेनोरा डिसुझावर ११-९, ११-६, ७-११, ४-११, ११-७ने सरशी साधत मुंबई उपनगरच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या प्रकारात मुंबई शहरकडून ३-०ने पराभूत झाल्याने पुण्याचे आव्हान उपांत्य फेरीतच संपले. यूथ मुलींच्या गटात झालेल्या अंतिम लढतीत मुंबई उपनगरने ठाणे संघावर ३-१ने विजयाची नोंद केली. २ विजय नोंदविणारी अनन्या बसक मुंबई उपनगरच्या विजेतेपदाची शिल्पकार ठरली. दिया चितळेने आपलीलढत जिंकत तिला साथ दिली.ठाणे संघातर्फे मनुश्री पाटीलनेएकमेव विजय मिळविला. यागटातही पुण्याचे आव्हानउपांत्य फेरीतच संपले. यजमान संघ मुंबई उपनगरकडून ३-०ने पराभूत झाला.कॅडेट मुली आणि सब ज्युनिअर मुलांच्या गटातून यजमान पुणे संघाने अंतिम फेरी गाठण्यात यश थव्मिळविले. या संघाने कॅ डेट मुलींच्या गटात मुंबई शहर संघावर ३-१ने मात केली. साक्षी पवार किशा झव्हेरीकडून पराभूत झाल्यानंतर राणिका सकपाळने एकेरी तसेच दुहेरी प्रकारात मिळून तिन्ही सामने जिंकत पुण्याला अंतिम फेरी गाठून दिली. विजेतेपदासाठी या संघासमोर मुंबई उपनगरचे आव्हान असेल.नागपूर संघाचे आव्हान ३-०ने संपुष्टात आणून पुणे संघाने सब ज्युनिअर मुलांच्या गटातून अंतिम फेरी गाठली. अर्चन आपटेने आदित्य हेरूळकरचा ११-५, ११-५, ११-४ने पराभव केला. अनेय कोवेलमुडी याने आदी चिटणीसवर ११-९, ११-४, १४-१२ ने मात केली. अमिश आठवले-अनेय कोवेलमुडी या जोडीने अनघ बोंडवे-आदी चिटणीस यांना ११-२, ११-२, ११-१३, ११-७ने नमवून पुण्याला अंतिम फेरी गाठून दिली. मुंबई शहरने नाशिकला ३-०ने नमूवन अंतिम फेरी गाठली.कॅ डेट मुले : उपांत्य फेरी : मुंबई उपनगर विवि नाशिक : ३-१ (अक्षत जैन विवि पायूष जाधव ११-३, ११-३, ११-६. तन्म राव पराभूत वि. कौशल चोपडा १२-१०, ७-११, ८-११, ११-५, ६-११. अक्षत जैन-तन्मय राव विवि आर्यन पोळ-कौशल चोपडा ११-९, ११-९, ११-७. अक्षत जैन विवि कौशल चोपडा १०-१२, ११-९, ११-७, १२-१०). ठाणे विवि पुणे : ३-१ (आर्यन देशपांडे पराभूत वि नील मुळ्ये ४-११, ८-११, ३-११. गौरव पंचंगम विवि वेदांग जोशी ११-६, ११-६, १२-१०. उदित सचदेव-गौरव पंचंगम विवि नील मुळ्ये-निशांत गद्रे ११-६, ११-९, ९-११, १०-१२, ११-९).कॅ डेट मुली : उपांत्य फेरी : पुणे विवि मुंबई शहर : ३-१ (साक्षी पवार पराभूत वि. किशा झव्हेरी ६-११, ७-११, ७-११. राधिका सकपाळ विवि अमिरा झव्हेरी ११-३, ११-६, ११-३. राधिका सकपाळ-देवयानी कुलकर्णी विवि किशा झव्हेरी-अमिरा झव्हेरी १७-१५, ५-११, १३-११, ९-११, ११-४. राधिका सकपाळ विवि किशा झव्हेरी ११-८, ११-५, १२-१०). मुंबई उपनगर विवि नाशिक : ३-२ (सना डिसुझा विवि मिताली पूरकर ११-१, ११-६, ११-९. हार्दी पटेल विवि सायली बक्षी २-११, १३-१५, ११-९, ११-९, ११-८. सना डिसुझा-हार्दी पटेल पराभूत वि सायली बक्षी-मिताली पूरकर ८-११, ११-१३, १०-१२. सना डिसुझा पराभूत वि. सायली बक्षी ६-११, १०-१२, २-११. हार्दी पटेल विवि मिताली पूरकर ११-३, ११-४, १६-१४).सब ज्युनिअर मुले : उपांत्य फेरी : पुणे विवि नागपूर : ३-० (अर्चन आपटे विवि आदित्य हेरूळकर ११-५, ११-५, ११-४. अनेय कोवेलमुडी विवि आ दी चिटणीस ११-९, ११-४, १४-१२. अमिश आठवले-अनेय कोवेलमुडी विवि अनघ बोंडवे-आदी चिटणीस ११-२, ११-२, ११-१३, ११-७). मुंबई शहर विवि नाशिक : ३-० (समिहान कुलकर्णी विवि पीयूष जाधव ११-५, ११-५, ११-४. ध्रुव दास विवि कौशल चोपडा ११-७, ११-४, ९-११, ११-५. समीहान कुलकर्णी-ध्रुव दास विवि आर्यन पोळ-कौशल चोपडा ११-७, ११-७, ११-६).यूथ मुली : उपांत्य फेरी : ठाणे विवि एयर इंडिया : ३-१ (श्रुती अमृते पराभूत वि अदिती सिन्हा १०-१२, १०-१२, ८-११. स्नेहल पाटील विवि दिशा हुलावळे ४-११, ११-३, ७-११, १४-१२, ११-६. श्रेया देशपांडे विवि मानसी चिपळुणकर १२-१०, ११-६, १२-१०. श्रुती अमृते विवि दिशा हुलावळे ११-७, ७-११, ११-४, ७-११, ११-५). मुंबई उपनगर विवि पुणे : ३-० (अनन्या बसक विवि ईशा जोशी १३-११, ११-९, ११-५. मनुश्री पाटील विवि प्रिथिका सेनगुप्ता ५-११, ११-८, ११-३, ११-७. दिया चितळे विवि स्वप्नाली नारळे ११-५, ८-११, ११-६, ११-६).अंतिम फेरी : मुंबई उपनगर विवि ठाणे : ३-१ (अनन्या बसक विवि श्रेया देशपांडे ५-११, ८-११, ११-६, ११-५, ११-४. मनुश्री पाटील पराभूत वि. श्रुती अमृते ८-११, १२-१४, १२-१४. दिया चितळे विवि तेजल कांबळे ६-११, ११-८, ११-६, १०-१२, १२-१०. अनन्या बसक विवि श्रुती अमृते ११-५, ११-५, ८-११, ११-५).महिला गट : उपांत्य फेरी : मुंबई शहर विवि पुणे : ३-० (सेनोरा डिसुझा विवि सलोनी शाह ११-५, ११-८, ११-२. श्वेता पराते विवि ईशा जोशी ११-६, ११-७, ११-८. मानसी चिपळूणकर विवि वेदिका भेंडे ११-५, ११-६, ११-६). मुंबई उपनगर विवि ठाणे : ३-० (अनन्या बसक विवि स्नेहल पाटील ११-२, ११-६, ११-६. ममता प्रभू विवि श्रुती अमृते ११-७, २-११, ११-७, ११-९. मृण्मयी म्हात्रे-मिश्रा विवि दिशा हुलावळे ११-८, ११-९, ११-७).अंतिम फेरी : मुंबई उपनगर विवि मुंबई शहर : ३-१ (ममता प्रभू पराभूत वि. श्वेत पराते १४-१२, ८-११, ८-११, ८-११. विधी शाह विवि सेनोरा डिसुझा ११-७, ५-११, ११-९, १०-१२, ११-९. अनन्या बसक विवि मानसी चिपळूणकर ६-११, ११-७, ११-९, ११-४. ममता प्रभू विवि सेनोरा डिसुझा ११-९, ११-६, ७-११, ४-११, ११-७).पुरूष गट : उपांत्य फेरी : ठाणे विवि मुंबई शहर : ३-० (सिद्धेश पांडे विवि शुभम आंब्रे ११-७, ७-११, ११-७, ११-६. सानिश आंबेकर विवि पार्थव केळकर १३-११, ११-९, १२-१०. जश दळवी विवि तन्मय राणे ७-११, ११-८, ११-४, ११-९). मुंबई उपनगर विवि नाशिक : ३-० (चिन्मय सोमय्या विवि पुनीत देसाई ११-६, ४-११, ९-११, ११-५, ११-८. रवींद्र कोटियान विवि अजिंक्य शिंत्रे १२-१४, ११-५, ११-३, ११-६. विरेन पटेल विवि पंकज रहाणे ९-११, ११-७, १२-१०, १२-१०). 

टॅग्स :PuneपुणेTable Tennisटेबल टेनिस