राज्य महिला बास्केटबॉल
By admin | Published: January 22, 2015 12:06 AM
राज्य महिला बास्केटबॉल स्पर्धा
राज्य महिला बास्केटबॉल स्पर्धामुंबईला धक्का देत नागपूर अंतिम फेरीतनागपूर : गत उपविजेत्या मुंबई संघाला पराभवाचा धक्का देत यजमान नागपूर संघाने बुधवारी येथील डीकेएम कोर्टवर सुरू झालेल्या राज्य महिला बास्केटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.नागपूरच्या मुलींनी सुरुवातीपासून सामन्यावर पकड निर्माण केली होती. अनुभवी मैथिली पानतावणे हिच्या सर्वाधिक २३ गुणांच्या बळावर नागपूरने ही लढत १९-९, ८-२, ७-११ आणि ११-४ अशा फरकाने जिंकली. मुग्धा अमरावतकरने नऊ आणि रसिका पांडे तसेच श्रेया दांडेकर यांनी प्रत्येकी पाच गुणांची भर घातली. मुंबईकडून श्रेयाल डेनिस हिने दहा, विद्या वरगडे हिने सहा गुण नोंदविले. त्याआधी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत नागपूरने लातूरचा २६-४ ने पराभव केला. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय महिला बास्केटबॉल संघाची कर्णधार प्रशांतीसिंग हिच्याहस्ते झाले. (क्रीडा प्रतिनिधी)