नवी दिल्ली : नरसिंग यादव डोप टेस्ट प्रकरणाची सुनावणी संपून एक दिवस झाला तरी नाडाचे डोपिंंगरोधी पॅनेल आपला निर्णय कधी देणार याविषयी अजूनही अस्पष्टता आहे. या निर्णयावर नरसिंगचे आॅलिम्पिक मधील सहभाग अवलंबून आहे.नरसिंग उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्यानंतर या प्रकरणाची दोन दिवस चाललेली सुनावणी गुरुवारी सायंकाळी संपली त्यावेळी नाडाच्या वकीलांनी याचा निर्णय शनिवारी किंंवा सोमवारी होईल असे सांगितले होते, परंतु आज शुक्रवारी दिवसभरात शनिवारी याचा निकाल लागणार की सोमवारी हे स्पष्ट झाले नव्हते. याबाबत नाडा आणि नरसिंगच्या वकिलांना विचारले असता त्यांनाही याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआय) च्या सुत्रांनी सांगितले की, याबाबत नाडाने त्यांना कोणतीही सूचना दिलेली नाही. (वृत्तसंस्था)
नरसिंग प्रकरणी अजुनही अस्पष्टता
By admin | Published: July 30, 2016 5:24 AM