शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

स्टोक्सने रोखली मुंबई एक्स्प्रेस!

By admin | Published: April 25, 2017 1:00 AM

टी-२० म्हणजे तडकून फलंदाजी. हे समीकरण मुंबई इंडियन्स-रायझिंग पुणे सुपरजायंट्स या सामन्याने पुन्हा मोडून काढलं.

सचिन कोरडे /ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - टी-२० म्हणजे तडकून फलंदाजी. हे समीकरण मुंबई इंडियन्स-रायझिंग पुणे सुपरजायंट्स या सामन्याने पुन्हा मोडून काढलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टीवर सोमवारी गोलंदाजी चमकली. पुणे संघाचे ६ बाद १६० धावांचे सहज वाटणारे लक्ष्य मुंबईसाठी कठीण होत गेले होते. शेवटच्या षटकापर्यंतची लढाई अखेर पुण्याने जिंकली. अवघ्या ३ धावांनी हा सामना जिंकत त्यांनी मुंबईची सलग ६ विजयांची मालिका ‘ब्रेक’ केली. बेन स्टोक्सचा मारा, इमरान ताहीरची फिरकी आणि सुंदरने पार्थिवच्या रुपात घेतलेला बळी लक्षवेधी ठरला. टी-२० क्रिकेटमधील हरभजनच्या २०० बळींच्या विक्रमाचा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करणयाची मुंबईकरांची संधी हुकली. या विजयानंतर पुणे संघ चौथ्या क्रमांकावर पोहचला. निश्चितच, याचे श्रेय पुण्याच्या गोलंदाजांना जाते.मुंबईला १२ चेंडूंत २४ धावांची गरज होती. मैदानावर कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दीक पांड्या होते. अशा स्थितीत मुंबई हा सामना जिंकणार असेही वाटत होते. मात्र बेन स्ट्रोकचा मारा मुंबईचे फलंदाज सहज पेलू शकले नाही. त्याने केवळ ७ धावा दिल्या. पांड्या बाद झाल्यानंतर रोहितने एक षटकार लगावत रंगत आणली. त्यानंतर ३ चेंडूंत ११ धावांची गरज असताना रोहित बाद झाला आणि सामना पुण्याकडे झुकला. भज्जीने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला मात्र तोपर्यंत सामना पुण्याने जिंकला होता. मुंबईला सहज वाटणारे हे लक्ष्य पुण्याच्या गोलंदाजांनी आव्हानात्मक केले. पार्थिव (३३) बाद झाल्यानंतर मुबईचे फलंदाज मोक्याच्या क्षणी बाद झाले. रोहितची ३९ चेंडूंत ५८ धावांची खेळी वाया गेली. त्याआधी, आक्रमक सुरुवात केलेल्या पुणेकरांना मोक्याच्या वेळी धक्के देत त्यांच्या धावगतीला लगाम घालण्यात मुंबईकरांना यश आले होते. त्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतरही रायझिंग पुणे सुपरजायंट्सने निर्धारित २० षटकात ६ बाद १६० धावांची मजल मारली होती. वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबई कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत धावांचा पाठलाग करण्यास पसंती दिली. कारण धावांचा पाठलाग करताना मुंबईने सामने जिंकले होते. दुसरीकडे रहाणे - राहुल त्रिपाठी या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना कोणतीही दाद न देता दमदार अर्धशतकी सलामी दिली. मिशेल जॉन्सन, मिशेल मॅक्क्लेनघन, यंदाच्या मोसमात पहिलाच सामना खेळत असलेला कर्ण शर्मा, हुकमी जसप्रीत बुमराह व अनुभवी हरभजनसिंग असे सर्वजण धावा रोखण्यात अपयशी ठरत होते. परंतु, अखेर कर्ण शर्मानेच मुंबईला यश मिळवून देत धोकादायक रहाणेला तंबूचा रस्ता दाखवला. अजिंक्य ३२ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारांसह ३८ धावा करून परतला. यानंतर राहुल त्रिपाठीने सूत्रे आपल्याकडे घेत ३१ धावांत ३ चौकार व २ षटकारांसह ४५ धावा काढल्या. मात्र, कर्णधार स्टिव्ह स्मिथ (१७), गतसामन्यात निर्णयक फटकेबाजी करणारा महेंद्रसिंह धोनी (७), अष्टपैलू बेन स्टोक्स (१७) अपयशी ठरल्याने पुण्याची धावसंख्या मर्यादित राहिली होती.