बर्मिंघम : मार्क वूडच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांची सुरेख गोलंदाजी तसेच बेन स्टोक्सच्या आक्रमक शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना आज अ गटात पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ४0 धावांनी पराभव करीत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आॅस्ट्रेलियाच्या पराभवामुळे बांगलादेशने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या आॅस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेडच्या ७१, अॅरोन फिंचच्या ६८ आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या ५६ धावांच्या खेळीच्या बळावर ५0 षटकांत ९ बाद २७७ धावा केल्या. इंग्लंडकडून मार्क वूडने ३३ तर लेगस्पिनर आदिल राशीद याने ४१ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले.सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून आधीच सेमीफायनलचे तिकीट पक्के करणाऱ्या इंग्लंडने २७८ धावांचा पाठलाग करताना ३५ धावांतच ३ फलंदाज गमावले होते; परंतु त्यानंतर स्टोक्स (नाबाद १0२) आणि कर्णधार इयॉन मॉर्गन (८७) यांनी चौथ्या गड्यासाठी १५९ धावांची भागीदारी करीत इंग्लंडचा विजय निश्चित केला. जोस बटलर २९ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने ४0.२ षटकांत ४ बाद २४0 धावा केल्या त्याच वेळेस दुसऱ्यांदा पावसाने व्यत्यय केला. इंग्लंड साखळीतील तिन्ही सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आॅस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे आवश्यक होते. बांगलादेशने काल न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्यामुळे ते गटात दुसऱ्या स्थानी राहत उपांत्य फेरीत पोहोचले.(वृत्तसंस्था)धावफलकआॅस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर झे. बटलर गो. वूड २१, अॅरोन फिंच झे. मॉर्गन गो. स्टोक्स ६८, स्टीव्ह स्मिथ झे. प्लंकेट गो. वूड ५६, हेन्रिक्स झे. प्लंकेट गो. राशीद १७, टीम हेड नाबाद ७१, ग्लेन मॅक्सवेल झे. रॉय गो. वूड २0, वॅडे झे. व गो. राशीद २, स्टार्क झे. रुट गो. राशीद 0, कमिन्स झे. व गो. राशीद ४, जम्पा त्रि. गो. वूड 0, हेजलवूड नाबाद १, अवांतर : १७, एकूण : ५0 षटकांत ९ बाद २७७. बाद क्रम : १-४0, २-१३६, ३-१६१, ४-१८१, ५-२३९, ६-२४५, ७-२४५, ८-२५३, ९-२५४. गोलंदाजी : जे. बॉल ९-१-६१-0, मार्क वूड १0-१-३३-४, प्लंकेट ८-0-४९-0, बेन स्टोक्स ८-0-६१-१, राशीद १0-१-४१-४, मोईन अली ५-0-२४-0.इंग्लंड : जेसन राय पायचीत गो. स्टार्क ४, अॅलेक्स हेल्स झे. फिंच गो. हेजलवूड 0, जो रुट झे. वॅड गो. हेजलवूड १५, इयॉन मॉर्गन धावबाद ८७, बेन स्टोक्स नाबाद १0२, जोस बटलर नाबाद २९, अवांतर : ३, एकूण : ४0.२ षटकांत ४ बाद २४0.बाद क्रम : १-४, २-६, ३-३५, ४-१९४. गोलंदाजी : स्टार्क १0-0-५२-२, हेजलवूड ९-0-५0-२, हेड २-0-९-0, हेनरिक्स १-0-६-0, जंपा ८.२-0-५२-0, मॅक्सवेल २-0-१४-0.
स्टोक्सच्या शतकाने इंग्लंडची सरशी
By admin | Published: June 11, 2017 12:41 AM