शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

रामचंद्रन हटाव मोहिमेला फुटबॉल महासंघाचे बळ

By admin | Published: June 19, 2015 2:25 AM

अ. भा. फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव

नवी दिल्ली : अ. भा. फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या मोहिमेत उडी घेतली आहे. एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आयओएला पत्र लिहून रामचंद्रन यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी लवकरात लवकर विशेष आमसभा बोलावण्याची मागणी केली आहे. मंगळवारी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने रामचंद्रनविरोधी मोहिमेस पाठिंबा दर्शविला होता. आयओए अध्यक्षांविरुद्ध दंड थोपटणाऱ्या संघटनांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघांची ५२.७७ टक्के, तसेच राज्य आॅलिम्पिक संघटनांच्या प्रतिनिधींची ५१.४२ टक्के मते रामचंद्रन यांच्या विरोधात गेली आहेत. अविश्वास प्रस्तावासाठी बैठक बोलवायची झाल्यास ५० टक्के मतांचा पाठिंबा आवश्यक असतो. हा आकडा पूर्ण झाला आहे. आयओए अध्यक्षांविरुद्ध अविश्वास आणण्याची मोहीम हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी सुरू केली. क्रीडा महासंघांपैकी फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉलिंग, तलवारबाजी, हँडबॉल, हॉकी, आईस हॉकी, आईस स्केटिंग, ज्यूदो, लूज, पेंटॅथलन, रायफल असोसिएशन, रग्बी, टेबल टेनिस, भारोत्तोलन, वुशू, याचिंग तसेच स्रूकर आणि बिलियर्ड्स यांचा समावेश आहे. विरोधात आवाज उठविणाऱ्या राज्य आॅलिम्पिक संघटनांमध्ये अंदमान-निकोबार, अरुणाचल, आसाम, बंगाल, बिहार, चंडीगड, दिल्ली, गोवा, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, नागालँड, ओडिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था) रामचंद्रन यांच्याविरूद्ध पाठिंब्यावर एकवाक्यता नाहीनवी दिल्ली : रामचंद्रन यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी सरसावलेल्या क्रीडा महासंघांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये किती एकोपा आहे याबाबत अद्यापही स्पष्टता दिसत नाही. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेन्द्र बत्रा यांनी रामचंद्रन हटाव मोहिमेस सुरुवात केली. पण, त्यांच्यापाठोपाठ पाठिंबा दर्शविणाऱ्या महासंघांपैकी अ‍ॅथलेटिक्स महासंघाने आपण रामचंद्रन यांच्याविरुद्ध आमसभा बोलविण्याच्या बाजूने असलो तरी त्यांच्यावर अविश्वास आणण्यास आपला नकार असल्याचे सांगितल्याने या पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे संकेत मिळतात.