जोहान्सबर्ग : जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सचे सर्वांत वेगवान शतक, हाशिम आमलाचे नाबाद दीडशतक (१५३) आणि सलामीवीर रिली रोसोचे शतक (१२८) यांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजपुढे धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्यांनी ५० षटकांत २ बाद ४३९ धावा केल्या. आफ्रिकेचा सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम मात्र थोडक्यात हुकला. हा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. त्यांनी हॉलंडविरुद्ध २००६ मध्ये ४४३ धावांचे लक्ष्य उभारण्याचा विक्रम नोंदवला होता. वेस्ट इंडीजनेनाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय हाशिम आमला, रिली रोसो आणि कर्णधार डिव्हिलियर्स यांनी फोल ठरवला. डिव्हिलियर्सने विक्रमाच्या वहीत नवी नोंद केली. आमला १५३ धावांवर नाबाद राहिला. त्याने १४२ चेंडूंत १४ चौकार ठोकले, तर रिली रोसोने ११५ चेंडूंत १२८ धावा केल्या. यात त्याचे ११ चौकार आणि २ षटकार आहेत. आफ्रिका संघ श्रीलंकेचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याचा उंबरठ्यावर होता. डिव्हिलियर्स बाद झाल्यानंतर मात्र त्यांना हा विक्रम मोडता आला नाही.तो जेव्हा मैदानात उतरला तेव्हा आफ्रिका संघाने ३८.३ षटकांत १ बाद २४७ धावा केल्या होत्या. डिव्हिलियर्सने येताच विंडीज गोलंदाजांची धुलाई सुरू केली आणि आतषी खेळी करीत त्याने विविध विक्रम मोडीस काढले. (वृत्तसंस्था)
वेस्ट इंडीजपुढे धावांचा डोंगर
By admin | Published: January 19, 2015 3:16 AM