शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

पोलंडचा जाता जाता बलाढ्य इराणला धक्का

By admin | Published: October 18, 2016 4:27 AM

पोलंडने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात बलाढ्य इराणला ४१-२५ असा धक्का देत ‘ब’ गटात खळबळ माजवली.

अहमदाबाद : विश्वचषक कबड्डी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पोलंडने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात बलाढ्य इराणला ४१-२५ असा धक्का देत ‘ब’ गटात खळबळ माजवली. त्याचवेळी उपांत्य फेरी निश्चित केलेल्या इराणसाठी हा पराभव धोक्याचा इशारा देणारा ठरला. सावध सुरुवात केलेल्या पोलंडने हळूहळू आपला वेग वाढवताना इराणवर वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली. या सामन्यात इराणला लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. विशेष म्हणजे एकदाही इराणला पोलंडवर लोण चढवता आला नाही.दुसरीकडे, पोलंडने इराणवर दोन लोण चढवून लक्षवेधी खेळ केला. पोलंडचा कर्णधार मायकल स्पिक्झोने जबरदस्त अष्टपैलू खेळ करताना चढाईमध्ये ८, तर बचावामध्ये ४ गुणांची कमाई करून निर्णायक भूमिका बजावली. पिओत्र पामुलाक यानेही चढाईमध्ये ९ गुणांची कमाई करताना मायकलला चांगली साथ दिली. दुसरीकडे, इराणकडून घोलम्बासने एकाकी लढत देत ७ गुणांची कमाई केली, तर कर्णधार मेराज शेख आणि फझेल अत्राचली या हुकमी खेळाडूंचे अपयश इराणला महागात पडले. मेराजला केवळ एक गुण घेता आला, तर अत्राचलीने अष्टपैलू खेळ केला, परंतु त्याला केवळ ४ गुणांवर समाधान मानावे लागले. मध्यंतराला पोलंडने १७-१४ अशी आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व राखले होते. (वृत्तसंस्था)>कांगारूंचा फडशा... बांगलादेशने तुफानी विजय मिळवताना दुबळ्या आॅस्टे्रलियाचा अत्यंत एकतर्फी लढतीत ८०-८ असा तब्बल ७२ धावांनी फडशा पाडला. या विक्रमी विजयाच्या जोरावर बोनस गुणाची कमाई करून बांगलादेशने ‘अ’ गटात तिसऱ्या स्थानी झेप घेतली. उपांत्य फेरीसाठी बांगलादेशला अखेरच्या सामन्यात अर्जेंटिनाला नमवणे अनिवार्य असून त्याचवेळी त्यांना भारताचा इंग्लंडविरुद्ध पराभव आवश्यक आहे. मध्यंतराला बांगलादेशने ३६-२ अशी आघाडी घेत विजयाची औपचारिकता बाकी ठेवली होती. कर्णधार अरुदुझामन मुन्शी (१७) आणि साबुज मिया (१०) यांनी एकहाती वर्चस्व राखत कांगारुंची शिकार केली.