शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बलाढ्य मुंबई ‘बॅकफूट’वर

By admin | Published: January 12, 2017 1:31 AM

पहिला डाव स्वस्तात गुंडाळला गेल्यानंतर गोलंदाजांचा सुमार कामगिरीचा फटका बसल्याने गतविजेते मुंबईकर रणजी अंतिम सामन्याच्या

इंदूर : पहिला डाव स्वस्तात गुंडाळला गेल्यानंतर गोलंदाजांचा सुमार कामगिरीचा फटका बसल्याने गतविजेते मुंबईकर रणजी अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुजरातविरुध्द बॅकफूटवर आले. मुंबईचा डाव पहिल्या दिवशी २२८ धावांवर संपुष्टात आणल्यानंत गुजरातने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद २९१ धावांची मजल मारत ६३ धावांची निर्णायक आघाडी मिळवली आहे. अजूनही त्यांचे ४ फलंदाज बाद होण्याचे बाकी आहेत. कर्णधार पार्थिव पटेल (९०) आणि मनप्रित जुनेजा (७७) यांनी गुजरातला आघाडी मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.होळकर स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी मुंबईला मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातने सावध सुरुवात केली. त्यात समित गोहेल (४) आणि प्रियांक पांचाळ (६) या दोन्ही सलामीवीरांना झटपट बाद केल्यानंतरही मुंबईकरांना पकड मिळवण्यात अपयश आले. भार्गव मेराई आणि पार्थिव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. अभिषेक नायरने भार्गवला बाद करुन ही जोडी फोडली. भार्गवने १०० चेंडूत ७ चौकारांसह ४५ धावा काढल्या.यानंतर, पार्थिव - मनप्रित जुनेजा या जोडीने चांगलाच जम बसवताना मुंबईकरांना घाम गाळण्यास लावले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२० धावांची महत्वपुर्ण भागीदारी केली. पुन्हा एकदा नायर मुंबईसाठी मोलाचा बळी मिळवताना पार्थिवला बाद केले. १४६ चेंडूत १२ चौकारांसह ९० धावा करुन पार्थिव ‘नर्व्हस नाइंटी’चा बळी ठरला. नंतर जुनेजाही शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने शतक ठोकण्यात अपयशी ठरला. त्याने ९५ चेंडूत ११ चौकारांसह शानदार ७७ धावांची खेळी केली. जुनेजानंतर रुजुल भट ३८ चेंडूत ४ चौकारांसह २५ धावा काढून परतला. त्याला बलविंदर संधूने तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर चिराग गांधी (१७*) आणि रुष कलारिया (१६*) यांनी दिवसअखेरपर्यंत नाबाद राहताना गुजरातची आघाडी वाढवली. मुंबईकडून अभिषेक नायरने यशस्वी मारा करताना ९१ धावांत ३ बळी घेतले. तर, शार्दुल ठाकूर (२/६७), बलविंदर संधू (१/५४) यांनीही चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)जीवदान महागात पडले...७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणारा मनप्रित जुनेजा याला मिळालेले जीवदान मुंबईला महागात पडले. जुनेजा वैयक्तिक १५ धावांवर खेळत असताना, नायरच्या गोलंदाजीवर शॉर्ट मिडविकेटला उडालेला त्याचा झेल श्रेयश अय्यरने सोडला.या जीनदानाचा जुनेजाने पुरेपूर फायदा घेताना शानदार अर्धशतकासह कर्णधार पार्थिवसह महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी केली.धावफलकमुंबई (पहिला डाव) : ८३.५ षटकात सर्वबाद २२८ धावा.गुजरात (पहिला डाव) : समित गोहेल झे. यादव गो. ठाकूर ४, प्रियांक पांचाळ झे. तरे गो. नायर ६, भार्गब मेराई झे. तरे गो. नायर ४५, पार्थिव पटेल झे. तरे गो. नायर ९०, मनप्रित जुनेजा झे. व गो. ठाकूर ७७, रुजुल भट झे. शॉ गो. संधू २५, चिराग गांधी खेळत आहे १७, रुष कलारिया खेळत आहे १६. अवांतर - ११. एकूण : ९२ षटकात ६ बाद २९१ धावा. गोलंदाजी : शार्दुल ठाकूर २३-४-६७-२; बलविंदर संधू २१-२-५४-१; अभिषेक नायर २७-६-९१-३; विजय गोहिल ८-०-३४-०; विशाल दाभोळकर ९-३-२१-०; सिद्धेश लाड ४-०-१८-०.