शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

यशाचा ‘स्मॅश’... लॉन टेनिस

By admin | Published: June 28, 2015 3:25 AM

ताकदवर फटके, वेगवान हालचाल आणि खेळाचा रोमांचक अनुभव हे सर्व काही लॉन टेनिस खेळामध्ये पुरेपूर अनुभवता येते. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभर

क्रिकेटपल्याड- रोहित नाईकताकदवर फटके, वेगवान हालचाल आणि खेळाचा रोमांचक अनुभव हे सर्व काही लॉन टेनिस खेळामध्ये पुरेपूर अनुभवता येते. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धांतून याचा अनुभव जवळून घेता येतो. महाराष्ट्रात असलेल्या महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एम.एस.एल.टी.ए.) या एकमेव राज्य टेनिस संघटनेच्या अंतर्गत मुंबईत विविध स्पर्धांचे आयोजन होत असते.शालेय स्तरापासून व्यावसायिक स्तरापर्यंतच्या अनेक स्पर्धांतून उदयोन्मुख गुणवान खेळाडू तयार होतात. शालेय स्तरावरील टेनिस स्पर्धा या मुंबई शालेय क्रीडा संघटना (एमएसएसए) अंतर्गत घेतल्या जातात. यामध्ये राज्य संघटनेचा सहभाग नसतो. विविध वयोगटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धांतून खेळाडूंना शालेय स्तरातूनच चमकण्याची संधी मिळते. जिल्हास्तरीय स्पर्धांत चमक दाखवल्यानंतर खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धांत खेळण्याची संधी मिळते आणि यानंतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होते. कॉलेज स्तरावरदेखील सातत्याने अनेक स्पर्धांचे आयोजन होत असते. यामुळेच नवोदितांना स्पर्धांत्मक खेळाचा चांगला अनुभव मिळत जातो.शिवाय, मुंबईमध्ये असलेल्या विविध क्लबच्या माध्यमातूनदेखील नवोदितांना अनेक संधी उपलब्ध होतात. काही क्लबच्या वतीने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जाते तर काही क्लबच्या वतीने थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केले जात असल्याने मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसमोर खेळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होते. शिवाय विविध वयोगटांत होणाऱ्या या स्पर्धांतून नवोदितांसाठी एकप्रकारे यशाचा मार्गच उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे एमएसएलटीए अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेत कोणताही खेळाडू वैयक्तिकपणे सहभागी होऊ शकतो. दरम्यान, टेनिस खेळ महागडा असला तरी गुणवान व आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या खेळाडूंना संघटनेच्या वतीने मदतदेखील होते. खेळातील संधी... इतर खेळांप्रमाणे या खेळातदेखील क्लब संस्कृती असल्याने प्रत्येक इच्छुक खेळाडूला टेनिसमध्ये कारकीर्द करण्याचा मार्ग मिळतो. सातत्याने विविध क्लबच्या वतीने आयोजित होणाऱ्या स्पर्धांतून व्यावसायिक स्पर्धांचा अनुभव खेळाडूंना होत असतो. यातूनच अनेक प्रतिभावंत खेळाडू घडत असतात. मुंबईमध्ये वर्षभर प्रत्येक वयोगटाच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन होते. यातील स्पर्धेतून अव्वल खेळाडू पुढे राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवतात. वर्षभरात एमएसएलटीए अंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धा आणि विविध क्लबच्या वतीने होणाऱ्या स्पर्धांतून खेळाडूंना विशिष्ट गुण मिळवता येतात. त्यानुसार खेळाडूंना रेटिंगही मिळतात. शिवाय राज्य मानांकन स्पर्धांतून खेळाडूंना आपले रेटिंग वाढवून राष्ट्रीय व आंतररष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी खेळाडूंना मिळते. नोकरीच्या संधी...राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होणाऱ्या खेळाडूंची सरकारकडून दखल घेतली जाते. राज्य मानांकन स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. शिवाय डेव्हिस कप, आशियाई स्पर्धेसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनादेखील सरकारी नोकरी मिळते. शिवाय विविध कॉर्पोरेट्स संघातील सहभागामुळे देखील खेळाडूंच्या नोकरीचा मार्ग मोकळा होतो. यामध्ये सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल ते म्हणजे रेल्वेचे. रेल्वे कायमच गुणवान खेळाडूंना संधी देत आली आहे. टेनिसमध्येदेखील हेच चित्र आहे. त्याशिवाय इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम यांसारख्या आॅइल कंपन्या, सर्व्हिसेस यांसारख्या संघात निवड होऊन खेळाडूंना नोकरीच्या अनेक संधी मिळत असतात.