शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

सुधा सिंगला सुवर्ण

By admin | Published: July 08, 2017 7:37 PM

3000 मी. स्टीपलचेस या प्रकारात भारताच्या सुधा सिंगने सुवर्णपदक मिळाले आहे.

ऑनलाइन लोकमत
 
भुवनेश्वर, दि.8-  आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमचा दुसरा दिवस भारतासाठी अत्यंत चांगला गेला आहे. 3000 मी. स्टीपलचेस या प्रकारात भारताच्या सुधा सिंगने सुवर्णपदक मिळाले आहे. शुक्रवारी भारताने चार सुवर्ण पदके जिंकली होती.  400 मीटरमध्ये भारतीय अॅथलिट्सनी महिला आणि पुरुष दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.  निर्मला शेरॉन आणि मोहम्मद अनस यांनी ही पदके पटकावली आहेत. 1500 मी धावण्याच्या स्पर्धेमध्ये पीयू चित्रा हिने प्रथम येत सुवर्णपदक पटकावले, तर पुरुष गटात अजय कुमार सरोज याने सुवर्ण पदक पटकावले. 
 
या चमकदार कामगिरीनंतर बोलताना सुधा म्हणाली, "आॅलिम्पिकनंतर माझा पाच महिने सराव बंद होता, गेल्या डिसेंबरमध्ये मी पुन्हा नॅशनल कॅम्पमध्ये प्रवेश केला आणि हळूहळू सराव सुरु केला. एशियन चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवण्याचे माझे ध्येय होते, आता मला पुढील महिन्यातील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवायचे आहे.""
 
पुरुष रिले शर्यतीदरम्याने केलेल्या चुकीमुळे यजमान भारतीय संघाला चमकदार कामगिरीनंतरही स्पर्धेबाहेर पडावे लागले. संघातील एका सदस्याने आपल्या सहकाऱ्याकडून बॅटन घेताना बाजूची लाइन पार केल्याने भारतीय संघाला फटका बसला. जॉन अनुरुप, व्ही. के. ई. दासन, जे. देबनाथ आणि अमिय कुमार मलिक यांचा समावेश असलेला भारतीय संघ फोटो फिनिशमध्ये कोरियाच्या पुढे होता, मात्र खेळाडूंकडून झालेल्या चुकीमुळे नंतर संघाला बाद ठरविण्यात आले. शर्यतीच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रात भारतासाठी शर्यत सहज ठरली. परंतु, देबनाथ आणि मलिक यांच्यात बॅटन पास करताना गडबड झाली. दरम्यान, या शर्यतीमध्ये कोरियाने ४०.१८ सेकंदाची वेळ देत हीट जिंकली. दुसऱ्या हीटमध्ये चीनने बाजी मारली. चीनी तैपईने ३९.४० सेकंदाची, तर थायलंडने ३९.४८ सेकंदाची वेळ नोंदवली. दुसरीकडे, अनु राघवन, जौना मुरमु आणि एम. अर्पिता यांचा समावेश असलेल्या भारताच्या महिला रिले संघाने ४०० मीटर अडथळा शर्यतीसाठी पात्रता मिळवली.
 
भारताचा जगतार सिंग डोपिंगमध्ये दोषी
भुवनेश्वर : येथे सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियन्सशीप अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा प्रमुख डेकाथलीट जगतार सिंग डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्याने खळबळ माजली. यामुळे भारताच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. पटियाला येथे राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) गेल्या महिन्यात घेतेलेल्या जगतारच्या युरिन ‘अ’ नमुना मेल्डोनियम चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळला. यामुळे त्याला आता अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले.
 
राजस्थानचा खेळाडू असलेल्या जगतारचा ‘ब’ नमुनाही दोषी आढळला, तर मात्र त्याच्यावर जास्तीत जास्त चार वर्षांपर्यंतची बंदी लागली जाऊ शकते. जगतारचा भारताच्या ९५ सदस्यीय संघामध्ये समावेश असून अभिषेक शेट्टीसह त्याला संघात स्थान मिळाले आहे. गुरुवारी सुरु झालेल्या डेकाथलॉनमध्ये केवळ अभिषेकने सहभाग घेतला. ‘नाडा’ने चार दिवसांपुर्वीच याबाबत भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघटनेला सुचित केले होते. यानंतर जगतारला भारती़य संघाबाहेर करण्यात आले होते आणि त्यामुळे तो स्पर्धेठिकाणी पोहचू शकला नाही. भारतीय संघाच्या एका पदाधिकाऱ्याए याबाबत सांगितले की, ‘स्पर्धा सुरु होण्याच्या तीन - चार दिवसांपुर्वीच डोपिंग चाचणीमध्ये जगतार दोषी आढळल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर आम्ही त्याला संघाबाहेर केले. तो भारतीय संघासोबत भुवनेश्वरला आला नाही.’ जगतारने फेडरेशन कप स्पर्धेत ६८८८ गुणांसह जेतेपद पटकावले होते. तसेच, शेट्टीने ६८१४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते.