शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

सुजल पिळणकर ठरला ‘मुंबई श्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 4:36 AM

अत्यंत रोमांचक झालेल्या अंतिम फेरीत आपल्या पीळदार शरीरयष्टीने तब्बल ५ हजार उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधलेल्या परब फिटनेसच्या सुजल पिळणकर याने ‘मुंबई श्री’ किताब पटकावला.

मुंबई : अत्यंत रोमांचक झालेल्या अंतिम फेरीत आपल्या पीळदार शरीरयष्टीने तब्बल ५ हजार उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधलेल्या परब फिटनेसच्या सुजल पिळणकर याने ‘मुंबई श्री’ किताब पटकावला. त्याचवेळी फिजीक्स फिटनेस गटामध्ये प्रथम बागायतदार आणि रोहन कदम यांनी बाजी मारली.बृहन्मुंबई बॉडिबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडिबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने कांदिवली येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल मैदानात झालेल्या या स्पर्धेत मुंबईकरांनी पीळदार शरीरयष्टीचा थरार अनुभवण्यास मिळाली. एकूण ९ वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत सुजलने फॉर्च्युन फिटनेसच्या सकिंदर सिंग आणि आर. एम. भटच्यासुशांत रांजणकर यांचा पाडावकेला.८५ किलो वजनीगटात विजेता ठरल्यानंतर सुजलपुढे ९० किलो वजनगीगट विजेत्या सकिंदर आणि ९० किलोहून अधिक गटाचा विजेता श्रीदिप गावड यांचे मुख्य आव्हान होते. परंतु, कोणतेही दडपण न घेता सुजलने आपले उत्कृष्ट प्रदर्शन सादर करताना परिक्षकांचे लक्ष वेधले. याशिवया संदेश सकपाळ (५५ किलो), विनायक गोळेकर (६०), प्रतिक पांचाळ (६५), विघ्नेश पंडित (७०), सुशील मुरकर (७५ किलो), सुशांत रांजणकर (८० किलो), सकिंदर सिंग (९०) आणि श्रीदिप गावडे (९०हून अधिक) यांनी आपआपल्या वजनी गटात जेतेपद पटकावले.त्याचवेळी, पुरुषांच्या फिटनेस फिजीक्स प्रकारात १७० सेमी उंची गटामध्ये परब फिटनेसच्या प्रथमेश बागायतदार याने वर्चस्व राखले. तसेच, १७० सेमी हून अधिक उंचीच्या गटामध्ये आरके फिटनेसच्या रोहन कदम याने बाजी मारली.मला पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचवायचे असून मुंबई श्री जेतेपद त्यादृष्टीने टाकलेले पहिले दमदार पाऊल आहे. इथपर्यंत मी अत्यंत खडतर प्रवास केला आहे. यंदा सलग सहा स्पर्धा जिंकल्याने मी फॉर्ममध्ये होतो. या पुरस्कारांच्या जोरावरच मी मुंबई श्री किताब पटकावू शकलो. आता मला महाराष्ट्र श्री आणि भारत श्री या स्पर्धांमध्ये चमक दाखवायची आहे. पण, माझ्या खेळात पैशांचे सोंग घेता येत नाही, त्यामुळे जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी स्वत:ला न्याय देऊ शकत नाही.- सुजल पिळणकर, मुंबई श्री विजेता.