शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

सुनील नारायणची लक्षवेधी खेळी, रैना सरस

By admin | Published: April 22, 2017 1:32 AM

रैनाच्या ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सने अखेरीस विजय मिळवला. मात्र या सामन्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती सुनील नारायणची ४२ धावांची तुफानी खेळी.

- आकाश नेवे/ऑनलाइन लोकमत

रैनाच्या ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सने अखेरीस विजय मिळवला. मात्र या सामन्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती सुनील नारायणची ४२ धावांची तुफानी खेळी. सुनील नारायणला सलामीला पाठवण्याचा केकेआरचा निर्र्णय दुसऱ्यांदा यशस्वी ठरला. या आधीही तो किंग्ज इलेव्हन विरोधात खेळताना सुनीलने सलामीला येऊन १८ चेंडूत ३७ धावा काढल्या होत्या.वेस्ट इंडिज्च्या सुनील नारायणकडे केकेआरने आतापर्यंत फक्त फिरकीपटू म्हणून पाहिले होते. त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर केकेआरला आतापर्यंत अनेक सामने जिंकून दिले आहे. मात्र या आयपीएलमध्ये केकेआरने नव्याने प्रयोग सुरू केला. तो म्हणजे पार्ट-टाईम ओपनर पाठवण्याचा. आधी ख्रीस लीन आणि आता सुनील नारायण हे या प्रयोगातले शिलेदार ठरले. या सामन्यात सुनीलच्या तुफानी खेळीने केकेआरला एक उत्तम सुरुवात करून दिली. सुनीलने या सामन्यात २४७ च्या स्ट्राईकरेटने धावा काढल्या. या खेळीत त्याने एक अनोखा विक्रम केला. ९ चौकार आणि एक षटकार ठोकत ४२ धावा केल्या. त्याच्या या खेळीत त्याने एकेरी किंवा दुहेरी धावा काढल्याच नाही. अशीच खेळी २००८ मध्ये डेक्कन चार्जसकडून सनथ जयसूर्या याने केली होती. जयसूर्याने त्या वेळी ३६ धावा काढल्या होत्या.

गुजरातने हा सामना जिंकताना १८८ या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. केकेआरला त्यांच्या होमग्राउंडवर पराभूत करताना २०१० च्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी साधली. मुंबईनेही केकेआरला पराभूत करताना १८८ या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. याच कामगिरीची पुनरावृत्ती गुजरात लायन्सने केली.गुजरातच्या डावाची सुरुवातही धमाकेदार होती. अ‍ॅरॉन फिंचला गवसलेला सूर ही गुजरातसाठी आनंदाची बाब आहे. फिंचने चौकार आणि षटकार ठोकत शाकीब आणि सुनीलच्या गोलंदाजीची पिसे काढली. मॅकक्युलमनेही नेहमीच्या अंदाजात आकर्षक फटके मारले. मात्र ठरावीक अंतराने हे दोन्ही फलंदाज बाद झाले.त्यानंतर आलेले कार्तिक आणि इशान किशन स्वस्तात बाद झाले.

पाचव्या षटकांत रैनाला या सामन्यात दोन वेळा जीवदान मिळाले. सुनील नारायणच्या गोलंदाजीवर त्याचा झेल उथप्पाने सोडला. तर पुन्हा एकदा नवव्या षटकात व्होक्सच्या चेंडूवर पठाणला झेल घेता आला नाही. या जीवदानाचा पुरेपूर लाभ रैनाने घेतला. त्याला कुलदीप यादवने बाद केले. मात्र तोपर्यंत केकेआरचा विजय ही फक्त औपचारिकताच शिल्लक राहिली होती. जाडेजाने चौकार लगावत विजय मिळवून दिला. १७ चेंडूत ४२ धावा करणारा सुनील नारायणच केकेआरचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. जेवढ्या धावा त्याने केल्या, तेवढ्याच धावा त्याने दिल्यादेखील. त्याने ४ षटकांत ४२ धावा दिल्या.

ब्रेंडन मॅकक्युलम याने ३३ धावा केल्या. याच जोरावर त्याने आॅरेंज कॅपच्या शर्यतीत मुंबईचा स्टार नितीश राणाला मागे टाकले. मॅकक्युलमने आतापर्यंत आयपीएल १० मध्ये २५८ धावा केल्या आहेत. पर्पल कॅप सध्या सनरायजर्स हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारकडेच आहे. त्याने सहा सामन्यात १५ गडी बाद केले आहेत.