ऑनलाइन लोकमत
दिल्ली, २७ - आयपीएलच्या नवव्या सत्रात सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आजच्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर चार गडी राखून विजय मिऴविला. या सामन्यात गुजरात लायन्सने दिलेल्या १६२ धावांचा सामना करताना सनरायझर्स हैदराबादने फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या शानदार खेळीच्या जोरावर १९.२ षटकात १६३ धावा केल्या. फलंदाज डेव्हिड वॉर्नरने ५८ चेंडूत तीन षटकार आणि ११ चौकार लगावत ९३ धावांची खेळी केली. तर, शिखर धवन अवघ्या शून्य धावेवर धावबाद झाला. हेन्रिक्स ११, युवराज सिंग ८, हूडा ४, बेन कटिंग ८ आणि ओझा १० धावा काढून बाद झाला.
याआधी गुजरात लायन्सकडून २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १६२ धावा केल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात लायन्सकडून फिंचनं ७ चौकार आणि २ षटकारांच्या बळावर ५० धावांसह अर्धशतक पूर्ण केल्या. तर, द्विवेदी ५, मॅक्युलम ३२, कॅप्टन रैना १, कार्तिक २६, स्मिथ १ ब्राव्हो २० धावा काढून तंबूत परतले. जडेजा आणि कुलकर्णी शेवटपर्यंत नाबाद राहिले.
आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची अंतिम फेरीत धडक असून आता सनरायझर्स हैदराबादचा अंतिम सामना बंगळुरुसोबत होणार आहे.