शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

सनरायझर्सचा शानदार विजय

By admin | Published: May 09, 2017 12:31 AM

गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर शिखर धवन (६२) आणि मोइसेस हेन्रीक्स (४४) यांच्या जोरावर गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने

हैदराबाद : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर शिखर धवन (६२) आणि मोइसेस हेन्रीक्स (४४) यांच्या जोरावर गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादने शानदार विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल असलेल्या मुंबई इंडियन्सला ७ विकेट्सने धक्का दिला. पराभवानंतरही मुंबईने आपले अव्वल स्थान कायम राखले असून, हैदराबादने प्ले आॅफसाठी मजबूत आगेकूच केली. मुंबईला निर्धारित षटकांत ७ बाद १३८ धावांमध्ये रोखल्यानंतर हैदराबादने १८.२ षटकातंच ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १४० धावा केल्या. शिखर धवनने ४६ चेंडंूत ४ चौकार व २ षटकारांसह ६२ धावांची विजयी खेळी केली. त्याला चांगली साथ देताना हेन्रीक्सने ३५ चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावा केल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरला (६) स्वस्तात बाद करून मुंबईकरांनी सामन्यात रंग भरले. परंतु, यानंतर धवन-हेन्रीक्स यांनी ९१ धावांची भागीदारी करून सामना पूर्णपणे हैदराबादच्या बाजूने झुकवला. तत्पूर्वी, गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या मुंबईची खराब सुरुवात झाली. दुसऱ्याच षटकात मोहम्मद नाबीने लेंडल सिमेन्सचा त्रिफळा उडवला, तर यानंतर सिद्धार्थ कौलने पार्थिव पटेल (२३), नितीश राणा (९) यांना झटपट बाद केल्याने मुंबईची सातव्या षटकात ३ बाद ३६ अशी अवस्था झाली होती. या वेळी वरच्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अष्टपैलू हार्दिक पांड्याने कर्णधार रोहित शर्मासह मुंबईची पडझड रोखण्यावर भर दिला. या दोघांनी जबाबदारीपूर्वक खेळताना मुंबईला समाधानकारक मजल मारून दिली. पांड्या २४ चेंडूत १५ धावांची संथ खेळी करून बाद झाला. परंतु, रोहितने कॅप्टन इनिंग करताना ४५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६७ धावांची झुंजार खेळी केली. मात्र त्याची झुंज व्यर्थ गेली. सिद्धार्थ कौल (३/२४), भुवनेश्वर कुमार (२/२९) यांनी अचूक मारा केला. (वृत्तसंस्था)