ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. 25- इंडियन प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर राऊंडमध्ये सनरायझर्स हैदराबादनं केकेआरवर 22 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हैदराबादनं उभा केलेला 163 धावांचा डोंगर पार करताना केकेआरची पुरती दमछाक उडाली आहे. केकेआरचा कॅप्टन गंभीरलाही फार काही चमक दाखवता आली नाही. उथप्पा 11, मुरनो 16, पांड्या 36, पठाण 2, यादव 23, सतीश 8, होल्डर 6 धावा काढून तंबूत परतले आहेत.
तत्पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सनं टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबादनं चांगली खेळी करत 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 162 धावा केल्या होत्या. हैदराबादकडून युवराज सिंगनं चमकदार कामगिरी करत 8 चौकार आणि 1 षटकारासह 44 धावांची खेळी केली. तर कॅप्टन वॉर्नर 28, धवन 10, हेनरिक 31, हूडा 21, ओझा 7, कुमार 1 धावा काढून तंबूत परतले आहे. शर्मा आणि सरण अखेरपर्यंत मैदानावर टिकून राहिले होते. शर्मानं नाबाद राहत 14 धावा केल्यात. तर केकेआरकडून भेदक गोलंदाजीच्या जोरावर कुलदीप यादवनं हेनरिक, वॉर्नर आणि कटिंगला तंबूत परत पाठवले. मॉर्केलनं 2 आणि होल्डर दोन बळी मिळवले.
गुणतालिकेत सुरुवातीच्या काळात अव्वल स्थानी असलेल्या हैदराबादला गेल्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. आता सनरायझर्स हैदराबादनं एलिमिनेटर लढतीत विजय मिळवून प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे.