विशाखापट्टणम : आठवडाभराची विश्रांती घेत ताजातवाना झालेला मुंबई इंडियन्स संघ सनरायझर्स हैदराबादवर आज रविवारी विजयाच्या इराद्याने खेळणार असल्याने ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.उभय संघ १८ एप्रिल रोजी एकमेकांविरुद्ध खेळले होते. सनरायझर्सने १५ चेंडू आणि ७ गडी राखून मुंबईला पराभूत केले. पराभवाची परतफेड करण्याची संधी आता मुंबईला राहील. दोन्ही संघांचे कर्णधार आतापर्यंतच्या सामन्यात रनमशिन ठरले. मुंबईसाठी रोहित शर्माने ३८३ आणि हैदराबादसाठी डेव्हिड वॉर्नरने ४१० धावा केल्या आहेत. हैदराबादसाठी शिखर धवन आणि मोझेस हेन्रिक्स यांनी ही जबाबदारी पेलली. युवराज पहिल्या सामन्यात मात्र तो काही करू शकला नव्हता. प्रतिस्पर्धी संघांना रोखण्याची वेळ आली, की उभय संघांच्या जलद माऱ्याची आठवण होते. फिरकी गोलंदाजीत हैदराबादच्या तुलनेत मुंबई सरस वाटते. उभय संघ यातून निवडणारमुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, विनयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, लेंडल सिमन्स, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लनघन, अक्षय वाखरे, नितीश राणा, हार्दिक पंड्या, जे. सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या व जितेश शर्मा.सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), युवराजसिंग, आशिष नेहरा, डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वरकुमार, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, इआॅन मॉर्गन, मुस्तफिझूर रहमान, आदित्य तरे, बरिंदर सरन, के. एल. राहुल, मोझेस हेन्रिक्स, परवेझ रसूल, केन विल्यमसन, नमन ओझा, अभिमन्यू मिथुन, आशिष रेड्डी, विपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, रिकी भुई, बेन कटिंग, विनय शंकर, आशिष नेहरा व टी. सुमन
सनरायझर्स-इंडियन्स रंगतदार लढतीची अपेक्षा
By admin | Published: May 08, 2016 3:19 AM