शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सनरायझर्सचा रोमांचक विजय

By admin | Published: May 10, 2015 4:23 AM

स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात ‘प्लेआॅफ’साठी शर्यत अतिशय चुरशीची झाली असून, आज हैदराबाद सनरायझर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला ६ धावांनी हरवून पदकस्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात

रायपूर : स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात ‘प्लेआॅफ’साठी शर्यत अतिशय चुरशीची झाली असून, आज हैदराबाद सनरायझर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला ६ धावांनी हरवून पदकतालिकेत १२ गुणांसह चौथे स्थान मिळविले. यामुळे मुंबई आणि बंगळुरूचा मार्ग अवघड बनला आहे.धुवाधार खेळी करणारा डी कॉक (३१ चेंडूंत ५०) बाद झाल्यानंतर केदार जाधवचा अर्धशतकी (नाबाद ६३) तडाखा दिल्लीचा पराभव वाचवू शकला नाही. सनरायझर्सच्या विजयात नाबाद अर्धशतक झळकाविणारा हेन्रिक्स आणि २ बळी मिळवणारा कर्ण शर्मा हे दोघे ‘हिरो’ ठरले. सनरायझर्सने दिल्लीपुढे १६४ धावांचे आव्हान उभारले होते. प्रत्युत्तरात, दिल्ली संघाला २० षटकांत ४ बाद १५७ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाला. त्यानंतर डी कॉकने धावांचा सपाटा लावला. त्याने अवघ्या २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये त्याच्या ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अर्धशतक पूर्ण होताच कर्ण शर्माने सनरायझर्सचा मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर जेपी ड्युमिनी (१२), युवराजसिंग (२) हे झटपट बाद झाले. त्यामुळे दिल्ली संघ ४ बाद ६६ अशा स्थितीत सापडला. केदार जाधव आणि सौरभ तिवारी (नाबाद २६) यांनी शानदार प्रदर्शन करीत दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर आणले मात्र, अखेरच्या षटकांत १६ धावांची गरज असताना त्यांना ९ धावा करता आल्या. त्याआधी, हेन्रिक्सच्या अवघ्या ४६ चेंडूंत नाबाद ७४ धावांच्या बळावर हैदराबादने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. इयॉन मोर्गनची २२ धावांची खेळीसुद्धा महत्त्वाची ठरली. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नरचा हा निर्णय इतका यशस्वी ठरला नाही. कारण, दोन्ही सलमीवीर अवघ्या ३१ धावांत तंबूत परतले. शिखर धवनला झहीर खानने मोर्केलकरवी झेलबाद केले. त्याने १० चेंडूंत १३ धावा केल्या. वार्नरने सावध खेळ करून डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याचाही संयम सुटला. उत्तुंग फटका मारण्याच्या नादात वॉर्नर तिवारीकरवी झेलबाद झाला. वॉर्नरने १५ चेंडूंत १ चौकार आणि एका षटकारच्या मदतीने १७ धावा केल्या. सलामीची जोडी परतल्यानंतर इयान मोर्गन आणि हेन्रिक्स या जोडीने डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी ३३ धावांची भागीदारी केली. मोर्गनला ११व्या षटकांत यादवने बाद केले. तो मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने हैदराबादच्या धावगतीला ‘ब्रेक’ लागला होता; पण दुसऱ्या बाजूने हेन्रिक्सची फटकेबाजी सुरूच होती. अखेर कर्ण शर्मा (१६) आणि रवी बोपारा (नाबाद १७) यांनी हेन्रिक्सला उत्कृष्ट साथ दिली. त्यामुळे हैदराबादला ४ बाद १६३ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून जयंत यादव आणि झहीर खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून कल्टर नीलने सर्वाधिक दोन बळी घेतले.(वृत्तसंस्था)