अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास पाटणा पोलिसांऐवजी मुंबई पोलिसांकडून करण्यात यावा, अशी याचिका सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केली होती. त्यावर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल न्यायालयानं आज सुनावला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा आणि मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं, असं न्यायालयानं निकालात म्हटलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुस्तीपटू अन् भाजपा नेता बबिता फोगाटनं महाराष्ट्र सरकारवर टीका केली. तिनं ट्विट केलं की,''सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय प्रशंसनीय आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही
महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा?
CPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'हॅलिकॉप्टर' शॉट मिस करताय; मग रशीद खानचा 'हा' फटका पाहाच
"Dream 11सोबत सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का!"
महेंद्रसिंग धोनी 1,250 फुटांवरून झेप घेतो तेव्हा... पाहा थरारक व्हिडीओ
IPL 2020 : होय, Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक, पण...; BCCIनं मांडली बाजू